अ....... आणि अस्मि
अ..... आणि अस्मि अ ---- हा 'अ' अक्षर, अहं, अनास्था, अतिरेकीपणा, अचाट, अफाट, अजागळ, अथांग, अस्ताव्यस्त, अज्ञात, अव्यक्त, अबोध .......... यापैकी कशाचाही असू किंवा नसूही शकतो. अस्मि ----हा अस्मि "मी आहे" किंवा "I am" या अर्थाने लादलेला असू किंवा नसूही शकतो. हे दोघेही एकमेकांची जागा घेऊ शकतात , त्यामुळे वेगवेगळे आहेत असे म्हणण्यातही अर्थ नाही. ( एकंदर आपल्या अहंशी ('जीव' या अर्थाने) आपल्या 'अस्मि'( मी आहे) या जाणीवेशी झालेला संवाद किंवा सेल्फ टॉक, थेरपी सेशनच्या खिळखिळीत चौकटीत कसेतरी बसवलेल्या कथारूपाने.................) ******************* अस्मि : रेने डेकार्ट म्हणून गेलायं, "I think therefore I am", गप्प बसला असता तर चाललं नसतं का, तसं तर मीही गप्प बसले तर चाललं असतं म्हणा. अ: मी काय बोलायचे हेही तूच ठरवणार आहेस नं, मगं चटकन ठरवं. अस्मि: काय अर्थ आहे बरं तुला 'अ' ?? एक अक्षर फक्त , खरंतर आवासून बसायचीच लायकी पण अथांगपणामुळे तुला बोलतं करायला लागतंय. अ: मी अ-क्षर आहे, मला मरण नाही, त्या अथांग मनाला मी अमर्याद सुद्धा केल...