पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिब्लो निसर्ग केंद्रास भेट

इमेज
  टेक्सासच्या उल्कापात वाटावा अशा उन्हाळ्यात इथे गार वाटते म्हणून आम्ही नियमितपणे जातो. सिबलो निसर्गकेंद्र हे अजिबात प्रसिद्ध नाही पण इथे तास दोन तास फिरायला प्रसन्न वाटते. शाळेच्या अधूनमधून येणाऱ्या सहली आणि पाच दहा पक्षीमित्र सोडले तर इथे विशेष कुणी येत नाही. कधी कधी फोटो शूट चाललेली दिसतात. त्यामुळे नेहमीच निवांत , शांत असते. घराजवळ असल्याने मलाही सुटसुटीत वाटते. याचा आम्ही खूप दिवस विचित्र उच्चार करायचो. Cibolo आहे तर सिबोलो/ किबोलो/चिबोलो / सायबलो पण प्रत्येक वेळेला मुलाने चूक काढली. आमच्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची accents आहेत. तोच फक्त मराठी मराठी उच्चारात आणि इंग्रजी अमेरिकन उच्चारात बोलू शकतो. मुलीचे तर उलट झाले आहे असे चिडवतो  , तर त्याने आम्हाला योग्य उच्चार शिकवला तो म्हणजे सिब्लो , हे 'ब' अर्धही नाही आणि पूर्ण पण नाही. तर ह्या नेटीव अमेरिकन / इंडियन 'सिब्लो' शब्दाचा अर्थ आहे टेक्सासची म्हैस अर्थात बायसन. Though the terms are often used interchangeably, buffalo and bison are distinct animals. Old World “true” buffalo (Capebuffalo ...

पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती

इमेज
  पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा? पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात? दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत? वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा पराधीन आहे जगतीं प...

निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे

इमेज
  निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का! बायबलमध्ये* लिहीलयं की "In the beginning was the word and the word was God " ह्याचा नेमका काय अर्थ असेल याचा मी बराच विचार केला. कुणी म्हणे ओम , कुणी आमेन कुणी अजून काही पण मला हा शब्द ,शब्द नाही तर नाद या अर्थाने जास्त योग्य वाटतो. शब्दाचे सुक्ष्मरूप नाद. कोणी ऐकले नसेल तर नादाची कल्पना करता येत नाही ज्यांनी ऐकलाय त्यांना सुद्धा नेमके काय ऐकले हे सांगता येत नाही. त्या नादब्रह्माला सुद्धा "शब्द' म्हणून बद्ध व्हावे लागले. कारण अव्यक्ताला व्यक्त करण्यासाठी शब्द कुठून आणनार.. मगं त्यालाच उत्तमो...

विश्वरूपदर्शन स्फुट

इमेज
  उपोद्घातः मी कृष्णडोहाच्या पैलतीरी कथा लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा मनात एक ढोबळ कथांत होता पण तो सुयोग्य पद्धतीने शब्दबद्ध करणे आव्हानात्मक वाटत होते. पण त्या कथेने मला पुढे नेले व कृष्णकृपेने हवा तसा अंत सुचला , तो इतका सुचत राहिला की या स्फुटाचा जन्म झाला. मला जे थोडे फार विश्वरूपदर्शनाचे आकलन झाले आहे ते मी या स्फुटात ओवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या दृष्टीने हे फक्त विराटरूप नसून चराचरात , सर्व अवस्थेत ,सर्व सजीवनिर्जीवात असलेले परब्रह्मतत्व आहे. या दर्शनाच्या वर्णनाला अंत असूच शकत नाही. तरीही मी चिरंतर सच्चिदानंद रूपाला शब्दबद्ध करण्याची धडपड केली आहे. ************************************ हा कथांत आहे....... तू नर आहेस आणि नारायणीही ! तुझी माझी यात्रा नित्य आहे , अनंत आहे. सहज आहे, निर्धारितही आहे. तू यात्रेला आरंभ कर." मार्ग मी गंतव्य मी ! स्वत्व मी ईश्वरत्व मी ! चिरंतन मी आणि काळ मी ! आरंभ मी आणि अंत मी ! व्यक्त मी तरी गुप्त मी ! आदी मी अनादी मी ! सृजन मी भेदन ही मी ! निमित्त मी प्राक्तन ही मी ! सुक्ष्म मी आणि स्थूल मी ! नित्य मी अनित्य मी ! अ-क्षरही मी आकार मी ! ओंकार...