पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बंदिवान मी ह्या संसारी

इमेज
बंदिवान मी ह्या संसारी <a href="https://en.m.wikipedia.org/wiki/Bandiwan_Mi_Ya_Sansari">बंदिवान मी ह्या संसारी</a> आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.  दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी  १९८८ आशा काळे(कमल)  लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं.  गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.  मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गर...

बार्बी - इंग्रजी चित्रपट

इमेज
  बार्बी खूप आवडला. आपल्या प्रि-टीन आणि टीन मुलींसोबत सोबत आवर्जून बघावा असा सिनेमा आहे. गर्ली सिनेमा आहे असं वाटून मुलगा आला नाही घरीच 'जोकर' बघत बसला, मग मला पश्चात्ताप झाला की त्यालाही न्यायला हवे होते. कारण छुप्या पुरुषप्रधान संस्कृतीचा अवेअरनेस सगळ्यांनाच यायला हवा. काही काही विनोद वरून वरवरचे वाटतात पण त्याचा अर्थ खूप प्रोफाऊन्ड आहे. मार्गॉट रॉबी व रायन गॉसलिंग* दोघांनीही खूप छान काम केले आहे. दोघेही अतिशय सुंदर दिसतात, कधीकधी खोटे वाटतात पण त्यांचं खोटं वाटणं सुद्धा खरं वाटणं आहे. भावलाभावली आहेत नं   . America Ferrera व तिच्या मुलीचं नातं खूप नॉर्मल आणि रिलेटेबल आहे, फार छान काम केले आहे त्यांनी. तिचे व बार्बीची जनक* रूथ हिचे त्यातले प्रोलॉग खूप चपखल वाटले. डोजोमोजोकासाहाऊस वगैरे पंचेसही सही जमलेत. शेवटची पंधरा मिनिटे कथानकावरची पकड सुटली आहे. शिवाय मला केनांचं गाणं कंटाळवाणं वाटलं. शॅन्गचीचा हिरो यात दुसरा केन आहे. तो नाचतो व दिसतो छान. अनेक केन व अनेक बार्बी आहेत. ही गोष्ट stereotypical Barbie ची आहे. आमच्याकडे यातली बरीचशी खेळणी होती अजूनही आहेत, आम्ही त्याचीही...

मी का वाचते ??

इमेज
आपण जे काही वाचतो, अगदी काहीही.... ते आपण स्वतःतल्या 'न जगलेल्या' , 'न अनुभवलेल्या' आयुष्यासाठी वाचत असतो. वैचारिक लेखन वाचण्यामागे तर लेखक सांगतोय त्या मनाच्या प्रतलात जाण्याचीच धडपड असते. जिथे एरव्ही आपल्याला involuntarily जाता येत नाही, कुणीतरी न्यायला लागतं. त्यामुळे हा प्रभाव फार काळ टिकत नाही. मगं आपण अजून वाचतो...अजून वाचतो....  हे विष  साधेसुधे नाही 'हलाहल' आहे. ज्या वेळी स्वतःला आपापले तिथे जाता येईल तेव्हा हे गूढच संपून जाईल. हॉलीवुडचे नट कसे म्हणतात, I do my own stunts, तसं I create my own हलाहल. दुसऱ्याच्या अनुभवाची खोली वाचणे व स्वतः ते अवकाश अनुभवणे असा फरक आहे. मगं आपले highs हे अजून higher आणि lows हे अजून lower मागतात आणि कौटुंबिक तेलकट चण्याफुटाण्यात मन रमत नाही/ किक बसत नाही. हे माझं 'मी (वैचारिक) का वाचते? ', यावर शोधलेलं उत्तर आहे. ते चूक/बरोबर असं काहीही नाही, फक्त निरिक्षण आहे.      मी का वाचते/वाचायचे सांगते. तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या मला एकसंध होण्याची धडपड होती. त्यामुळे कुठे तरी आपले दुवे शोधत वाचायचे. प्रत्येक पुस्तकात आपल...