पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

The fall of the house of Usher

इमेज
  'Maybe' Spoiler alert**** नेटफ्लिक्सवर  The fall of the house of Usher  बघितली. एडगर ॲलन पो यांच्या संकलित गूढ कथांना एकत्र करून तयार केलेले कथानक व Mike Flanagan याचं दिग्दर्शन आहे. प्रचंड खिळवून ठेवणारी, अनप्रेडेक्टिबल, गूढ, कुठंकुठं अभद्र आणि भयंकर आहे. सर्वांची कामं जबरदस्त झाली आहेत. एका अनौरस बहिणभावांवर- Madeline Usher आणि Roderick Usher झालेला अन्याय, जिजसवर अंधविश्वास ठेवून औषधं न घेता तिळातिळाने झिजून मरणारी आई, माणुसकी नसलेले वडील, समाजात नसलेले स्थान -अशी पार्श्वभूमी असलेले ते दोघे अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. त्यात बहिणीचे पात्र अतिशय धूर्त , मतलबी व बुद्धिमान आहे. वैचारिक स्पष्टता असलेले नकारात्मक स्त्री पात्र खूप दिवसांनी बघायला मिळाले. तिनं अमेरिकन आयुष्यावर व त्यातील औषधी कंपन्यांच्या गुंत्यावर बोलून दाखवलेलं भाष्य तर फारच चपखल वाटलं. ३१ डिसेंबरला रात्री एका समांतर विश्वात असलेल्या पबमधे जातात, तिथल्या मृत्यूदेवतेला(Metaphysical -gothic entity) स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काही वचनं देऊन बसतात. नंतर बाहेर येऊन हे गूढ ते विसरून जातात. त्यानंतर जवळजवळ पन्नास ...

फराळाचा PTSD कसा द्यायचा?

इमेज
एखाद्या धक्कादायक घटनेनंतर मनात त्या अनुभवाची एक भीती बसते, त्याला PTSD (post traumatic stress disorder) म्हणतात. ---------------- आपण केलेल्या गोष्टी/चांगलेचुंगले / मेहनतीने केलेल्या पाककृती विसरून जाणारा किंवा 'रिप्लेस मेमरी' असणाऱ्या नवरा असलेल्या मैत्रिणींना समर्पित....  एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला. तेव्हापासूनच काही आयडिया हाताशी ठेवल्यात... फक्त मुलींसाठी.  फराळाचा PTSD कसा द्यायचा?    1. कच्च्या मालासाठी वेगवेगळ्या दुकानात पळवायचं, तरी उणिवा काढून किरकिर करायची. उदा. रवा/पोहे जाड/ पातळ/ बारीक, खोबरं- शेंगदाणे खवट. 2. शंभर मेसेज-फोन करून जास्तीत जास्त महत्त्व अधोरेखित करायचं. सारखं 'कुठपर्यंत झालं' विचारत रहायचं . किराणा खरेदीत झालेल्या चुकांवर खूप हताश होऊन सुस्कारे सोडत रहायचं. 3. आठ दिवस आधीपासूनच शॉर्टकट स्वैपाक करायचा, का विचारलं तर मोठ्याने 'फ रा ळ' एवढंच म्हणायचं. फराळाच्या रुखवतापैकी काहीनंकाही डायनिंग टेबलवर मांडून ठेवायचं व वातावरणनिर्मिती करायची. उदा....

ड्रीम गर्ल २

इमेज
 <strong>ड्रीम गर्ल २ नेटफ्लिक्स</strong> आयुष्मान खुराणा, अन्नु कपूर ,परेश रावल, अभिषेक बॅनर्जी, अनन्या पांडे, असरानी, मनोज जोशी, राजपाल यादव, सीमा पहावा, विजय राज. जमला नाही, फार कंटाळवाणा कधीमधी सवंग व ओढून ताणून वाटतो. ड्रीम गर्ल १ उथळपणाला 'खो' देऊन परत आला होता पण धमाल होता. मला आवडला होता, आयुष्मानला मध्यमवर्गीय पात्राचा विनोद सही सही पकडता येतो. जो उच्छृंखल असला तरी चलाख असल्याने उथळ वाटत नाही. इथे ती पकड सगळ्यांचीच सुटली आहे. परेश रावल किती दिवसांनी दिसला, बरं वाटलं पण भूमिका गुळमुळीत आहे. अन्नु कपूर अतिशय उत्तम काम करतो पण इथं लक्षात रहात नाही. तसं सगळ्यांनाच अनन्या पांडे चावली असावी, त्यामुळे एवढी तगडी स्टारकास्ट असूनही सर्वांचीच कामं विस्मरणीय झालीत. आक्षेपार्ह नोंद म्हणजे अन्नु कपूरचे पात्र कर्ज फेडण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी मुलाला मुलगी करून बार गर्ल व्हायची गळ घालतो, नंतर हे प्रकरण उगाचच वाढवत नेले. बरं चीप तर चीप करकचून विनोद तरी करावेत तेही नाही, गाणी तर फारच बंडल. शेवटचं आयुष्मानचं 'प्यार तो प्यार होता है' हे सगळ्यांना दिलेलं प्रवचन तर का...