Transcendence
Transcendence (Prime) (Trailer)
Johnny Depp, Rebecca Hall, Morgan Freeman, Cillian Murphy
जॉनी डेप हा नॅनो टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला जगप्रसिद्ध वैज्ञानिक आहे. त्याची 'पार्टनर ईन सायन्स' आणि 'पार्टनर ईन लाईफ' रेबेका सुद्धा त्याची त्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात साथ देते. प्रत्यक्षात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मात्र ती फिलियांथ्रॉपिस्ट विचारांची आहे. तिच्या महत्त्वाकांक्षा मात्र जग अजून सुखी कसे होईल, पर्यावरणात समतोल कसा येईल, लोकांचं आयुष्य अजून सोयीचं कसं होईल- अशा असतात. त्याच्या महत्वाकांक्षा ह्या- तो अजून कसा आंतरजाल, टेक्नॉलॉजी व स्टेम सेल रिसर्च मधे पुढे कसा जाईल अशा आहेत.
त्यांचा एक फिलॉसॉफीकल विचारांचा दुसरा प्रोग्रामर मित्रंही आहे. ह्या तिघांची एक कंपनी आहे, ज्यात मॉर्गन फ्रिमन गुंतलेला आहे आणि गोवर्नमेंट ऑफिशियल आहे. हा प्रकार हाताबाहेर जातो आहे म्हणून एक ॲन्टि -टेक्नॉलॉजी/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेरिरिस्ट ग्रूप याच्यावर गोळीबार करतो. सुरवातीला तेच खलनायक वाटतात पण नंतर त्यांचेही चूक नव्हते असे वाटते. त्यांच्या गोळीबारात जॉनी डेपला गोळी लागून तो मरणार असतो पण स्वतःच्या प्रोग्रामच्या बळावर रेबेकाच्या मदतीने सगळी consciousness किंवा बुद्धी - मन आणि चेतना अपलोड करून पुन्हा शरीराशिवाय जिवंत होतो. शरीराच्या मर्यादा संपल्याने बुद्धी व मन अमर्याद होते. मन अमर्यादच असतं पण ती जाणीव विकसित करण्याचे तंत्र या चेतनेने खुलं होतं.
यात त्याच्या फीलिंग्ज/ भावना हरवून तो नॅनो टेक्नॉलॉजीच्या बळावर सगळ्यावर ताबा मिळवतो, अक्षरशः प्रत्येक अणू रेणू मधे त्याला सेल्फ हिलिंग व ह्याच्या मनाशी कनेक्शन जोडता यायला लागते. Omniscient..! शेवटी व्हायरस मिळवून रेबेकाच्या मदतीने त्याला संपवावे लागते.
कल्पना खूप अमेझिंग आणि काळाच्या पुढची आहे , चित्रपट दहा वर्षे जुना आहे. कामं उत्तम, तगडी स्टारकास्ट आहे. सुरवातीला कथानक ज्या उंचीवर जाते त्यामानाने क्लायमॅक्स एकदम थिटा किंवा ॲब्स्ट्रॅक्ट वाटतो. पण मला ह्या विषयावरचे सिनेमे आवडतात म्हणून मी दुसऱ्यांदा पाहिला. वैचारिक खाद्य भरपूर मिळेल, समाधान मिळेल की नाही माहीत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा