सतलुज
सतलुज" पाहिला. जबरदस्त चित्रपट आहे. सर्वांनी पाहायला हवा. शेवटी अगदी हृदय पिळवटून निघते. मी आता सगळंच लिहिणार आहे बहुतेक. स्पॉयलर्स असतील. त्यांनी सतलुजच लिहिले होते हिंदी नामावलीत म्हणून मी तेच लिहिले. Bollywood Music जसवंत सिंह कालरा नावाचा साधासा बॅंकेतील कर्मचारी आणि मानवी हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता ( दलजित दोसांजी) याच्या धैर्याची आणि शौर्याची कथा आहे. कथेची सुरुवातच त्याचा बेपत्ता मित्र आणि नंतर त्या मित्राला शोधण्यासाठी वेडी झालेली त्याची आई - तिला शोधताना होते. आधी पोलीसांची मदत घेण्याचा प्रयत्न करतात पण उडवून लावलं जातं, मग जंग जंग पछाडण्यात सरळ अंतिम संस्कार ज्या स्मशानात होतात तेथे पोचतात, सगळी बेवारस प्रेतं आहे असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिलेली असतात. त्यांची नावासहित नोंदणी केलेली त्यांना त्या स्मशानातील यादीत सापडते. तेथून कळत जातं की अशी पंचवीस हजार लोक बेपत्ता आहेत व त्यांना त्यांच्या घरचे लोक शोधत आहेत आणि एकीकडे बेवारस म्हणून शेकडो मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते आहे. Movies हे सगळे दहशतवाद कमी करण्यासाठी "मारलेले" , खलिस्तानी चळवळींविरूद्ध "म...