पोस्ट्स

मुझसे दोस्ती करोगे - रेस्ट्स ईन 'पिसेस'

इमेज
  मुझसे दोस्ती करोगे - रेस्ट्स ईन 'पिसेस' -पूर्वार्ध कलाकार  : काही उगीच हसणारे, काही अति तर काही जेमतेम अभिनयही न करणारे, काही मान डुले , काही सुट्टीवर आल्यासारखे उत्साही, काही अतिशय आनंदी ( सगळे इतर ठिकाणी उत्तम अभिनय करतात पण इथे वावच नाही.) दिग्दर्शक/निर्माते :  तेच ते गोल बेड असणारे चोप्राज् संगीतकार : हेहेहेहेहेSSSSS ,हुहुहु, आआआआआ त सगळी गाणी बसवणारे पात्र : शिंदे, कुलकर्णी, कानेटकर थोडीच असणारेत ते खाली सतरंज्या पसरून झोपतात, गोलबेडवाले(गोबेवा) यांची आवडती माणसं मलहोत्रा, खन्ना, सहानी, कपूर आहेत.आपण नाही!!!!! ये दिमागमें एकबार फिट कर दिया तो आपकी पिसं काढणेकी कल्पकता वाढती है! लहानपणापासून राज(हृतिक), टीना(करीना) आणि पूजा(राणी) यांची आणि यांच्या एकुण पाच पालकांची खूपच दोस्ती असते तरी हा 'मुझसे दोस्ती करोगे?' हा प्रश्न का विचारलाय कोण जाणे, 'मुझसे लव्ह करोगे' किंवा 'मुझसे लग्न करोगे' जास्त जुळलं असतं. स्थळ  :रेल्वे स्टेशन मनाली काळ: पंधरा वर्षांपूर्वीचा सीन : उगीचच हसणारी पाच मोठी, उगीचच भावूक होणारी तीन छोटी माणसं-मुलं... यात किरण कुमार- हृचाबा, ...

हृता

इमेज
        हृता        आज मला तोच दिवस आठवतोयं ज्यादिवशी तुला , तुझी आई व मी पहिल्यांदा 'देवी अहिल्याबाई होळकर' अनाथाश्रमात पहायला आलो होतो. तीन साडे तीन वर्षांची असशील, भेदरलेल्या डोळ्यांनी इकडेतिकडे बघत लाईनमधे एका ताईचा हात धरून टुकूटुकू बघत होतीस. तुझ्या आईला एक मिनिटही लागला नाही ओळखायला. तिने सरळ मिठीच मारली तुला. तुला बघताक्षणी तुझ्या प्रतिक्षेत काढलेली प्रदीर्घ वर्षे कुठे गळून पडली काय माहिती , काही आठवेनासं झालं. आईने व मी मिळून केलेले सगळे पेपरवर्क देऊन उरलेल्या औपचारिकता पूर्ण केल्या. आता दोन आठवडे ट्रान्झिशन मधे तुला घेऊन सगळे शहर फिरत तुझे तीन वर्षातले सगळे कौतुक करत फिरत होतो. नाही म्हणायला धाकधूकही होतच होती, तुला फक्त गुजराती यायचं तेही भीत भीत काहीसं अस्पष्ट बोलायचीस. छोटा शब्दकोश ताबडतोब घेऊन टाकला. पण तिथल्या संचालिका मालतीताईंच्या मते दत्तक मुलांपेक्षा आईवडील जास्त घाबरतात. त्यांच्यामते सगळ्यात अशक्त आणि किरकिरे मूल तू होतीस. आता तू थोडीच विश्वास ठेवणारेस, फार फोटोही नाहीत दाखवायला. तिथे तुला सगळे मिनी म्हणायचे , आईला ते नावच वाटल...

अ....... आणि अस्मि

इमेज
अ..... आणि अस्मि   अ   ----  हा 'अ' अक्षर, अहं, अनास्था, अतिरेकीपणा, अचाट, अफाट, अजागळ, अथांग, अस्ताव्यस्त, अज्ञात, अव्यक्त, अबोध .......... यापैकी कशाचाही असू किंवा नसूही शकतो. अस्मि  ----हा अस्मि "मी आहे" किंवा "I am" या अर्थाने लादलेला असू किंवा नसूही शकतो. हे दोघेही एकमेकांची जागा घेऊ शकतात , त्यामुळे वेगवेगळे आहेत असे म्हणण्यातही अर्थ नाही. ( एकंदर आपल्या अहंशी ('जीव' या अर्थाने) आपल्या 'अस्मि'( मी आहे) या जाणीवेशी झालेला संवाद किंवा सेल्फ टॉक,  थेरपी सेशनच्या खिळखिळीत चौकटीत कसेतरी बसवलेल्या कथारूपाने.................) ******************* अस्मि : रेने डेकार्ट म्हणून गेलायं, "I think therefore I am", गप्प बसला असता तर चाललं नसतं का, तसं तर मीही गप्प बसले तर चाललं असतं म्हणा. अ: मी काय बोलायचे हेही तूच ठरवणार आहेस नं, मगं चटकन ठरवं. अस्मि: काय अर्थ आहे बरं तुला 'अ' ?? एक अक्षर फक्त , खरंतर आवासून बसायचीच लायकी पण अथांगपणामुळे तुला बोलतं करायला लागतंय. अ: मी अ-क्षर आहे, मला मरण नाही, त्या अथांग मनाला मी अमर्याद सुद्धा केल...

वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग ३

इमेज
  वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग ३ मी बाकांवर बसत नाही पण फोटो काढायला विसरत नाही. फ्रिडाचा कुत्रा. Damianita. हे मला मधले बोट उभे केलेल्या निवडूंगासारखे दिसतेय. 😉 फ्रिडाचे फुलपाखरू छान किती दिसते. 'जुने' कुटुंबाचे जुने घर. कशा प्रकारच्या मातीत कशा प्रकारची लॉन लावावी म्हणजे पर्यावरणस्नेही लॉन! छोटे टूमदार एकाच खोलीचे घर. वल्लरी . गुलाब गँग😁. गोल कमानी. सहल समाप्त !!😊 लेखन व फोटो ©अस्मिता. <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7883595537263568"      crossorigin="anonymous"></script>