सतलुज
सतलुज" पाहिला. जबरदस्त चित्रपट आहे. सर्वांनी पाहायला हवा. शेवटी अगदी हृदय पिळवटून निघते. मी आता सगळंच लिहिणार आहे बहुतेक. स्पॉयलर्स असतील. त्यांनी सतलुजच लिहिले होते हिंदी नामावलीत म्हणून मी तेच लिहिले. Bollywood Music
जसवंत सिंह कालरा नावाचा साधासा बॅंकेतील कर्मचारी आणि मानवी हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता ( दलजित दोसांजी) याच्या धैर्याची आणि शौर्याची कथा आहे. कथेची सुरुवातच त्याचा बेपत्ता मित्र आणि नंतर त्या मित्राला शोधण्यासाठी वेडी झालेली त्याची आई - तिला शोधताना होते. आधी पोलीसांची मदत घेण्याचा प्रयत्न करतात पण उडवून लावलं जातं, मग जंग जंग पछाडण्यात सरळ अंतिम संस्कार ज्या स्मशानात होतात तेथे पोचतात, सगळी बेवारस प्रेतं आहे असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिलेली असतात. त्यांची नावासहित नोंदणी केलेली त्यांना त्या स्मशानातील यादीत सापडते. तेथून कळत जातं की अशी पंचवीस हजार लोक बेपत्ता आहेत व त्यांना त्यांच्या घरचे लोक शोधत आहेत आणि एकीकडे बेवारस म्हणून शेकडो मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते आहे. Movies
हे सगळे दहशतवाद कमी करण्यासाठी "मारलेले" , खलिस्तानी चळवळींविरूद्ध "मारलेले" असं काहीतरी करत मोठ्या हुद्द्यावर पोचलेले साधे हवालदार आणि पोलिसांची पूर्ण सिस्टिम ह्यात गुंतलेली आहे असे लक्षात येते. एकीकडे आईवडील तरूण मुलाला शोधून हतबल आक्रोश करत आहेत, त्यांना तुमचा मुलगा दहशतवादी होता म्हणून त्यांची जमापुंजी खंडणी सारखी वसूल करायची किंवा तुमचा मुलगा दहशतवाद्यांनी पळवून नेला आहे आहे त्याला सोडविण्यासाठी पैसा द्या म्हणून पिळवणूक करायची. अशी कितीतरी जिनोसाईड कित्येक वर्षे ज्यांना सद्ररक्षणाय, खलनिग्रहणाय नेमले आहे त्यांनीच. बहुतेक प्रेतं तीस वर्षांच्या आतील तरूणांची नाहीतर त्यांच्या शोधात असलेल्या बायका, मुलं, म्हातारी कुणीही. इतका दुराचार तोही इतकी वर्षे चालला. कसलाही वचक नसलेली, माणुसकी नसलेली पंजाब पोलिसची वरपर्यंत गुंतलेली यंत्रणा. Dictionaries & Encyclopedias
याचा जाब विचारण्यासाठी उभा राहून स्वतःची बायको, चिमणी मुलं, आईवडील धोक्यात आलेलं असताना कॅनडाचे असायलम न घेता येथेच राहून काम तडीस नेण्याची जिद्द आणि जिवाची पर्वा न करण्याची हिंमत असलेला जसवंत. हा खरा धुरंधर होता म्हणून ह्या वर बॅन आला.
शेवटी जसवंतसिंहलाच धमक्या यायला लागतात, त्याच्या मित्राने ह्याला कल्पना दिली असल्याने पन्नास पोलिस घरात शिरून - सुग्गा नावाचा डिजी तेथेच साग रोटी खावून पूर्ण कुटुंबाचा खून करून जातो. दुसऱ्या दिवशी सहा प्रेतं. कसलाही वचक नाही!!
वारंवार निदर्शने करून दिल्ली सरकारचे, पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्यात हा यशस्वी होतो, तेव्हा ह्यालाच किडनॅप करतात. तेव्हा सिबिआय ऑफिसर म्हणून अर्जुन रामपालची एन्ट्री होते. दलजित आणि अर्जुन दोघेही हिरो वाटले. दोघांनी अतिशय तळमळीने काम केले आहे, कॅरेक्टर्स एकदम पोचतात. जसवंतसिंहच्या तपासात सुद्धा अनेक गोष्टी समोर येतात आणि पंजाब पोलिसची खरी प्रतिमा जगासमोर येते.
जसवंतसिंह - was a real unsung hero! /\ त्याचं म्हणणं - संपूर्ण जगातील अंधकार दूर करण्याची ताकद माझ्यात नसेलही पण धैर्याने लढत राहिलो तर किमान एका समईच्या ज्योतीसारखा माझ्या आसपासचा अंधकार दूर होईल. प्रत्येकाने आपला दिवा पेटवला की जग उजळून निघेलच. एवढंच तर करायचं आहे आपल्याला. आपल्या लोकांसाठी - सगळे आपलेच आहेत. पोलिसांची माझं काही शत्रुत्व नाही पण ही शेकडो बेवारस प्रेतं - त्यांच्या घरचे लोक ह्यांना उत्तर देणं ज्यांचं कर्तव्य आहे त्यांच्याकडून न्याय हवा आहे.
त्याचे इतके हाल हाल करून मारले जाते, डोळ्यात पाणी आलं. नंतर माश्यांनी पटकन खाऊन प्रेत सापडू नये म्हणून मोठ्या जखमा करून पुलावरून सतलज नदीत त्याला ढकलून दिले जाते. त्याचं प्रेत कधीही मिळाले नाही. हे सगळे उघडकीस येण्यासाठी बऱ्याच संघर्षातून समुद्र सिंह ( अर्जुन रामपाल) स्वतः जातो. जसवंत सिंहची बायको न घाबरता नवऱ्याची लढाई नीतिमूल्यांच्या वारसा पुढे चालवते. फारच हृदयद्रावक कथा आहे. सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. पिक्चर मधे अवास्तव हिंसाचार नाही, जो आहे तो नेमका आहे.
बरेचसे अभिनेते कुठे कुठे पाहिले आहेत. कोहरा ह्या सिरीज मधला सुग्गा, बिट्टा - ओरिजनली गिल - कंवलजीत सिंह सर्वांचीच कामं खरी वाटतात. चित्रपट एकदम नेमका पोचतो, उगाच फाफटपसारा नाही किंवा प्रेक्षकांना मुद्दाम ठरवून रडवणं नाही. सत्यच एवढं तेजस्वी आहे की बाकीच्या बेगडी झळाळीची गरज या नायकाला नाही. बराचसा सिनेमा पंजाबी आहे, नंतर हिंदी होत जातो तरीही कळतं पण लक्ष देऊन ऐकावं लागतं. माझा काही भाग हुकला असेल कदाचित. Movies
चित्रपटावर बॅन आणण्यासारखं यात काही नाही, मुळीच पटलं नाही. दाबून ठेवल्याने सत्य बदलणार नाही, एवढी दुर्बळ लोकशाही असेल तर तिचा सर्वनाश आधीच झाला आहे. आपल्या चुकांची जबाबदारी घेणं, त्या पुन्हा होणार नाहीत हे बघणं, मानवी हक्कांसाठी संवेदनशील असणं सर्वांचेच कर्तव्य आहे. बॅन आणणं ही शुद्ध पळवाट आहे!! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला तर आहेच, मानवी मुल्यांची पायमल्ली सुद्धा झाली आहे.
हा चित्रपट जरूर पाहा. एका unsung hero साठी. तो अज्ञात राहायला नको म्हणून.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा