पोस्ट्स

ब्रह्मास्त्र -मोठ्यांचा 'छोटा भीम'

इमेज
  'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच. अमिताभचे नाव 'रघू' आहे , मला फिस्सकन हसू आलं. त्याला 'रघूगुरु' असं एकदोनवेळा म्हटलेलं, मला 'लघुगुरु' सारखं ऐकू आलंय. ह्याने फक्त औपचारिकता म्हणून हजेरी नोंदवली आहे. तो वेगवेगळे जॅकेट घालून 'लँड्स एन्डची' जाहिरात असल्यागत मिरवताना, फक्त प्रीतिभोजासाठी लग्नाला तयार होऊन आलेल्या दूरच्या नातलगासारखा वाटतो. ('आजोबा उठा, सुन्मुखाची वेळ झाली.' आजोबा कशाचे उठतात , प्रीतिभोजानंतर डायरेक्ट विहिण पंगतीला उठायचे ठरवूनच झोपलेले असतात. हे खरे वानप्रस्थ !) यांचे आश्रम हिमालयाच्या पायथ्याशी असून मागून मोकळे व 'सुरक्षिततेसाठी' समोरून कुलूपबंद आहे. हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय , तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे. त्यामुळे व्हिलन यायचे तेव्हा येतातच, हिरो मात्र कुलूपाशी झगडत बसतो. मौनी रॉयच्या गळ्यावर कांजण्या आल्यासारखी चित्रं गोंदवलीत. मौनी दंडाला पेडोमिटर लावून हिंडल्यासारखं अस्त्राचा तुकडा लावून फिरते, हे जेव्हाजेव्हा लाल होतं, तिचे डोळेही लाल होतात. जसं फोनवरचा मेसेज अॅपल वॉचवर...

शेरदिल-द पीलीभीत सागा अर्थात नरो वा शार्दूलो वा- वाघ का माणूस

इमेज
     (#स्पॉयलर्स असतील) न सके तो सुन मन गुंज हो अलख जगा मन स्वयं स्वयं में मन मुस्कावे जिव भूलकावे पीको प्रेम ज़रे लाज ना लागी हां जो जागी बदली जे ही घडी मोह में बांधे सधे ना साधे चुलबुल चित धरे माया खेला है अलबेला खुल खुल खेल करे मन अंतर तू जा ढूंढ सुन सके तो सुन मन गुंज हो अलख जगा मन स्वयं स्वयं में https://youtu.be/GuuOrsKoJWY अरे मुठ्ठी मुठ्ठी बोइदे मुठ्ठी मुठ्ठी बोइदे अरे मुठ्ठी मुठ्ठी बोइदे बीजा अरे माटी मांगे बूटा बोइदे रे भैया अरे बूटा बूटा बोइदे उगाइदे रे भैया बूटा बूटा उगने दे रे बूटा बूटा उगने दे भूमि अपनी मांगे रे मांगे उसके गहने रे पत्ता पत्ता बूटा बूटा जंगल जंगल रहने दे जंगल मांगे धुप पानी धुप पानी बहने दे. https://youtu.be/f0JfvWsY7k0 आताच शेरदिल :द पीलीभीत सागा बघितला नेटफ्लिक्सवर. तुकड्यातुकड्यांतल्या विचारांचा वर्षाव झाला. दिशाहीन भरकटीतून योग्य मार्ग जरी सापडला नाही तरी निदान अयोग्य मार्गाची जाणीव होते असा काहीसा प्रवास हा सिनेमा बघताना होतो. कथाबीज सत्यघटनांवर आधारित आहे. गरीब शेतकरी, विषमता, गरिबीला कंटाळून केलेल्या आत्महत्या हा विषय काही आपल्याला नवीन...

टेस्ला गं बाई टेस्ला

इमेज
  टेस्ला गं बाई टेस्ला आमच्याकडे एक बरीच जुनी मळकट कार आणि एक थोडी जुनी बेढब वॅन आहे. या दोन्हीही मी नियमित चालवत असते. पण दोन तीन वर्षात आमच्या नेबरहूडात हळूहळू सगळ्या टेस्ला दिसायला लागल्यात.   किंवा साधुसंतांना सगळीकडे जसा ईश्वर दिसतो तशा मला ह्याच दिसत असतील. मागच्या वर्षीपासून तर ड्रायव्हिंग करताना दर तीन मिनिटाला एक टेस्ला बाजूने सुळकन निघून ही जाते. आणि मला आपोआपच हीन भावना येते. कसं ते सांगायला '3 ईडियट्स' मधल्या रँचो सारखा डेमो देते. त्याशिवाय काही ही हीन भावना तुमच्यापर्यंत पोचणार नाही.         शेजारशेजारच्या दोन थेटरात दोन सिनेमे लागलेत , त्याचे पोस्टर बाहेरच्या भिंतीवर लावलेय. एकात 'गहराईयां'ची दीपिका पडूकोण तर दुसऱ्यात कुठल्याही सिनेमाची काकुळतीला आलेली निरूपा रॉय आहे. कल्पना करा, निरूपांच्या सिनेमाचे तिकीट पन्नास रुपये व दीपिकाच्या सिनेमाचे हजार आहे, आणि तुमच्याकडे पंचवीस रूपये आहेत तर तुम्हाला सिनेमाला न जाताही हीन भावना येईल. शिवाय घरी येऊन टिव्ही बघावा तर एक-दोन वाहिन्यांवर 'आमची माती-आमची माणसं' लागलेलं असंल, तर जे काय मनात तया...

काही गाणी आणि आरस्पानी

इमेज
       काही गाणी आणि आरस्पानी     बन लिया अपना पैगंबर    तैर लिया सात समंदर    फिर भी सुखा मन के अंदर    क्यों रह गया    रे कबिरा मान जा....    रे फकिरा मान जा..   आजा तुझको पुकारें तेरी परछाईंया     साप जसा कात टाकतो तशी मी लिहिते,  दुसरी इतकी चपखल आणि क्रीपी उपमा याक्षणी तरी आठवत नाही. काही तरी साचल्यासारखं वाटतं , व्यक्तं झालं की मोकळं होऊन आपापल्या मार्गाला जाता येतं. सापाला त्याचाच भाग असलेल्या काती विषयी काही विशेष आसक्ती वाटत नाही पण मुक्तताही हवी असते आणि सक्तीही नको असते, तसंचं काहीसं होऊन बसतं, बहुतेक मी विचित्र आहे, माझा प्रवास आरस्पानी असावा एवढाच आग्रह आहे !     प्रवासात काही का येईना सगळी बेटंच आहेत, ध्रूवपद नाही, हे कळाल्याने बहुदा बऱ्याचशा गोष्टी 'whatever' गटात गेल्यात. भारतातून परत येऊन तीन महीने होतील, यावर वैयक्तिक न होता लिहावं असं वाटलं. पण पझलचे हजारो तुकडे एकदाच अंगावर पडल्यावर कसं लिहिणार. जे मलाच कळत नाहीये ते कसं बांधणार, वाचणाऱ्याला ...

मुक्काम शांतिनिकेतन: पु.ल.देशपांडे

इमेज
        मी पुलंच्या पुस्तकांची पारायणं केलेली आहेत, तुम्हीही केलेली असतील. जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ , हे तर पाठ होते. नंतर एक शून्य मी , रेडिओवरील भाषणे व श्रुतिका, एका कोळियाने हेही दोनदोनदा तरी वाचलेले होते, पण साधारण दहा वर्षांपूर्वी मी त्यांच्या लेखनातून बाहेर पडले , आऊटग्रो झाले, माहिती नाही काय पण काही तरी झाले खरे !!!           मग हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं , का घेतलं , रवींद्रनाथांच्या आकर्षणातून घेतलं की पुलच्या की दोहोंच्या.... असो.  हे पुस्तक मला खूप आवडलं. आता लक्षात आलंय की पुलच्या विनोदी लेखनापेक्षा मला पुलंचे असे वैचारीक लेखन अधिक भावते, जवळचे वाटते कारण ते intrigue करते. विशेष म्हणजे हे लेखन कालातीत का काय म्हणावे तसे वाटले. तसं म्हणावं तर हे पुस्तकं ही एक दैनंदिनी आहे. पुलंनी रवींद्रनाथांच्या जबर ओढीने, संगीताविषयीच्या ध्यासाने, बंगाली भाषेबद्दलच्या आत्मियतेने व एकुणच Bengali Renaissance बद्दल थोडे फार जाणून घेण्याच्या आस्थेने, एक महिना शांतिनिकेतन येथे वास्तव्य केले होते. ...

मोगरा फुलला

इमेज
  रूक्मिणीचे अंगण , काय नव्हते तिथे... वेगवेगळी झाडं, वेलींच्या महिरपी, फुलांची गर्द राई. सतत निरनिराळे प्रयोग करायची रूक्मिणी, गावभरच्या लेकीबाळी हक्कानं फुलं, पानं न्यायच्या. श्रावणातल्या मंगळागौरीला तर स्वतःच्या हाताने वेण्या माळून कौतुकाने द्यायची. अंगण आणि तिच हसू कायम फुललेले असायचं. पण घरामागच्या मोगऱ्यात तिचा विशेष जीव,किती पसरलाय... घरभर सुवास दरवळत असतो.        रूक्मिणी काळीसावळी जरा बुटकी म्हणावी अशी, तेल लावून एक वेणी व चापूनचोपून बसवलेली साधीशी फिक्कट रंगाची सुती साडी नेसलेली. पण कधीही गावातल्या कोणी तिला निराश व दूर्मुखलेलं बघितलं नाही. सतत हसतमुख, मदतीला तत्पर व पानाफुलांत, मळ्याच्या कामात गुंतलेली....            तिचं लहानपण हालाखीच्या म्हणता येईल इतक्या गरीबीत गेलं.. ती झाली तेव्हा आईबाबाला कोण आनंद झालेला. साध्याशा भाड्याच्या दोन खोल्यांच्या घरात हे तिघं आनंदाने रहायचे, पण रूक्मिणी आठ वर्षांची असताना, आई जिथं कामाला जायची तिथल्या गच्चीवरून पाय घसरून पडली आणि..... जिथे दोन वेळंच्या पोटाच्या भर...

पालकाची पातळ भाजी

इमेज
पालकाची पातळ भाजी   पूर्वतयारीचा वेळ:  २० मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४० मिनिटे साहित्य : पालक बारीक चिरून तीन ओंजळ , २ वाटी शिजवलेली तूर डाळ, चणा डाळ १ चमचा , भरपूर लसूण तुकडे करून, मुठभर शेंगदाणे, दोन तीन चमचे बेसन/डाळीचे पीठ, चिंचेचा कोळ १ चमचा (मी तयार घातला, तो जास्त आंबट असतो. तुम्ही भिजवून केला तर थोडा जास्त लागेल आणि गरम पाण्यात भिजवले तर लवकर होतो ) एक चमचा गूळ, एक चमचा काळा मसाला, तिखट , मीठ, जिरे, मोहरी ,दोन तीन सुक्या लाल मिरच्यांचे मोठे तुकडे. क्रमवार पाककृती:  तेलाची फोडणी(मोहरी जिरे) करून थोडा लसूण, लाल मिरच्या , व चणा डाळ घालून परतून घ्यावे. मग पालक परतून घ्यावा, एक वाफ येऊन थोडा होतो , हळद घालावी , डाळ पाणी घालून पातळ करून घालावी, एक उकळी आली की बेसन अर्धी वाटी पाण्यात नीट मिसळून ते ह्यात घालावे , व थोडे पाणी घालून चिंच, गूळ , काळा मसाला, व मीठ घालून झाकण लावून भरपूर शिजवावे, gas बंद करावा. मगं पुन्हा भरपूर तेलाची वेगळी फोडणी करावी त्यात मोहरी, लसणाचे तुकडे, शेंगदाणे, कढीपत्ता, घालून खुटखुटीत झाले की तिखट घालून थोडे परतून gas बंद करावा...