पोस्ट्स

ललित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भजेहम् भजेहम्

इमेज
  श्रीहरी स्तोत्रम्  ऐकून आलेली विचारमौक्तिकं ललितामध्ये ओवण्याचा प्रयत्न केला आहे. ************ तूच नारायणा ,कधी गळ्यात पुष्पहार घालून बसतोस आणि मी तुला हरी हरी म्हणून हाका मारते आणि तू 'ओ ' तर देत नाहीसच पण सर्पमाळ व रूद्राक्षाने सुशोभित होऊन येतोस. मगं मला वाटते की हा आशु-तोष तर नक्की ऐकेल.. मला कधी कळणार की तुम्ही एकच आहात. मला वाटायला लागते तुम्हा पुरुषांना का कळणार माझी अस्वस्थता , माझे स्त्रीह्रदय! हा विचार जणू तुला कळला की तू प्रकटतोस ती जगदंबा होऊन. तिच्यात मगं मी माझी आई शोधते . ती माझ्या रूदनाकडे दुर्लक्ष करू शकणार नाही अर्थातच ! सर्व रेणूंना कारण असणारी रेणुका म्हणते मला सुक्ष्मात शोध बाळा. आता आली की पंचाईत ! माझ्या संसारी दृष्टीत मात्र आसक्तीच भरलेली असल्याने मला कसं दिसणार. हा माझ्या दृष्टीचाच नाहीतर बुद्धीचाही दोष आहे असे मानूण मी गणरायाला आर्त करते. तो माझ्या दृष्टीपथातले विघ्न दूर करतो व शारदाकृपेने मतीवरही प्रकाश पडतो. ती जगदंबा, तो विनायक, ती सरस्वती तूच आहेस मला कधी कळणार. भगवद्गीता वाचावी म्हणाले तर कुठे अर्जुन कुठे मी ?! पुत्रप्रेमाणे आंधळा झालेला तो धृतर

पिया तोरा कैसा अभिमान आणि आत्मविश्वास वगैरे

इमेज
  पिया तोरा कैसा अभिमान आणि आत्मविश्वास वगैरे पिया तोरा कैसा SS अभिमान म्हणताना शुभाजी दुसऱ्या 'कैसा' ला अशी सुरेल , गंभीर तान घेतात की तो अभिमान आणि त्याचं वैयर्थ सुद्धा समान क्षणात शून्य होतात. खरंच एक चित्र स्वतःला सहस्र शब्दात व्यक्त करत असेल तर एक गाणं सहस्र भावनांना मुक्त करत असेल, वाट करून देत असेल असं म्हणायला हरकत नसावी. संगीत अशी निर्मिती आहे ती दुसऱ्या अशा निर्मितीला वाट करते , जिचे अस्तित्व आत आहे हे माहितीही नसतं. ओह असही वाटू शकते का मला , कुठले प्रतल आहे हे..... असं काहीसं. काय ते मन , ज्याला कुठलेही भौतिक अस्तित्व नाही , ते आपल्याला किती भौतिक, अभौतिक, आध्यात्मिक स्तरावर लीलया नेऊ शकते. कधी हसतखेळत, कधी नाचतनाचत, कधी अचानक सुटलेल्या वाऱ्यासारखे बेभान, कधी अभ्रासम तरल इतकंइतकं तरल की कळणार नाही मी कधी आले या भावनेप्रत .. म्हणालं तर सूक्ष्म म्हणालं तर जडजंजाळ !! श्यामच्या आईने श्यामला सांगितले, "मनाला घाण लागू नये म्हणून जपं"! पण माझे डोके उलटे चालत असल्याने माझ्या मनात येतं का जपायचं? थोडंका छळलयं याने मला मगं मी का जपू याला !! कोणती घाण? निर्मळ मनाला क

सोप मेकिंग

इमेज
  सोप मेकींग खूप खूप दिवसापासून मनात होते सोप मेकींग आणि candle मेकींग शिकायचे आणि मुलांनाही शक्यते शिकवायचे. खूप विडीओ पण पाहिले पण सामान आणने झालेच नाही. आणि हे मागे पडत गेले. पण आता घरीच जायबंदी झाल्यामुळे पुन्हा शिकावे वाटले आणि प्रयोग करायचे ठरवले. मुलीलाही खूप उत्साह आहे याबाबत. आमच्या घराजवळ Michaels नावाचे मोठे दुकान आहे. ते छंदीष्ट लोकांचे नंदनवन आहे. मी आणि मुलगी तिथे तासन्तास रमू शकतो. त्यांचे एक कुपनही मिळते अधूनमधून मग ते आम्ही आमच्या छंदाच्या प्रयोगासाठी वापरतो. कधीतरी काही खूप छान बनवतो आणि कधी सगळे वाया जाते किंवा अपेक्षेप्रमाणे बनत नाही. पण ह्या प्रक्रियेत ऐवढी मजा येते की आम्ही पुन्हा पुन्हा काही ना काही करत रहातो/ घेत रहातो. काही माहिती नसताना एकदम पैसे घालून वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याऐवजी मला वाटले की मी किट घ्यावे, ज्यात सर्व साबन बनवता येईल. फार काही पर्याय दिसले नाही मग आम्ही एक बेसिक सोप मेकींग किट घेतले. कुपन जोडून ते सोळा डॉलर ऐवजी बारा डॉलरला मिळाले. त्यात सात साबण बनतील असेही लिहिले होते पण प्रत्यक्ष पाचच बनतील असे लक्षात आले.... नाही तर फार पातळ वड्या झाल

पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती

इमेज
  पराधीन आहे जगतीं व तुझे रूप चित्ती दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा? पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात? दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत? वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा पराधीन आहे जगतीं पुत्र

रीथ मेकिंग आणि रॉक पेंटिंग

इमेज
  रीथ मेकिंग मी सोप मेकिंंग ह्या लेखात छंदीष्ट लोकांचे नंदनवन असलेल्या ज्या दुकानाचा उल्लेख केला आहे त्या 'मायकेल्स' मध्ये जवळजवळ दर आठवड्याला क्राफ्ट क्लासेस होतात. ज्याची फीस अगदी दोन ते पाच डॉलर इतकी कमी असते , हेतू हा की तुम्ही लागणारे सामान तिथून घ्यावे व त्यांचा फायदा व्हावा. याकरता लेकरं तिथे सोडून उगाच या आयल मधून त्या आयल मध्ये काहीबाही घेत हिंडणाऱ्या आया व मिळेल ती खूर्ची पकडून मुलाशेजारी फोनवर टिपी करणारे बाबा हे तिथले सामान्य दृश्य असते. त्यामुळे विशिष्ट सणावाराला हे दुकान अगदी फुलून आलेले असते. दर तीन महिन्याला ऋतूप्रमाणे येणारे साधे- छोटे इस्टर सारखे उत्सव किंवा मातृदिन/पितृदिन ते फार बिग डिल असलेले Thanksgiving /Christmas या सगळ्याचे रीथ /wreath बनवता येते. अगदी डोहाळं जेवण, बारसं, लग्न किंवा भिंतीवर लावायला असंख्य प्रकारचे रीथ मिळतात. किंमत साधारण वीस डॉलर ते अगदी दोनशे डॉलर पर्यंत असते.    आधी भारतात असताना रीथ म्हणजे थडग्यावर ठेवायचे फुलाचे रिंग असे वाटून काही तरी अभद्र प्रकार वाटायचा . इथे आल्यावर बऱ्याच दरवाज्यांवर रीथ टांगलेले दिसले. ते एक आनंदाचे, नव्या ऋत

करदे मुझे मुझसेही रिहा , मारा आणि कोहंसोहं

इमेज
करदे मुझे मुझसेही रिहा , मारा आणि कोहंसोहं           कुन फाया कुन  हे सूफी गाणे मला आवडते. ह्या तथाकथित बंड लोकांबद्दल त्यांच्या झपाटलेपणामुळे एक गूढ आकर्षण वाटते. खासकरुन या गाण्यातील त्या ओळी ज्यात "अब मुझकोभी हो दिदार मेरा , कर दे मुझे मुझसेही रिहा" अशी आर्त आळवणी आहे. माझ्यापासून मला रिहा /मुक्त / स्वतंत्र कर म्हणजे नक्की काय असेल ? नेमक्या कोणत्या अदृश्य तुरुंगात आहोत आपण जो दिसत नाही, जाणवत नाही. मग त्यातून बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न तरी का करणार आणि कसा करणार !          मला नेहमीच वाटते की मी या ग्रहावरची नाही, या जगातलीच नाही . कुठल्यातरी अधिक चांगल्या ग्रहावरून झालेल्या चुकांमुळे पतन होऊन मी इथे आले आहे. प्रत्येकाला असा अनुभव आयुष्यात कधी न कधी आलाच असेल. या चाकोरीचा या साचेबद्धतेचा कंटाळा येऊन एक प्रकारची बधीरता येते. मगं आपण अस काही तरी ऐकतो, बघतो, वाचतो किंवा अनुभवतो की एक क्षण स्वतःच्या स्व-स्वरूपाशी जोडल्या जातो. तो आनंदाचा क्षण जो खरे तर क्षणीक वैराग्यामुळे अनुभवला आहे तो आपल्या मनाला पुन्हा त्या संसारचक्राला जुंपतो. आणि आपण नात्यांच्या आभासी बंधनांशी पुन्हा ए