पोस्ट्स

सिनेमा आणि मी: भाग २

इमेज
  'तू झूटी मैं मक्कार' आवडला नाही. हिंदी फिल्म इंडस्ट्री वरून कोणी तरी कोंबडं उतरवून टाकायची वेळ आली आहे. पूर्ण वेळ रणबीरचे क्लोजअप आहेत. देखणाच दिसतो तो पण अति केलंय. दाढीतल्या दोन केसांमधले अंतरही मोजू शकाल. अधेमधे श्रद्धा कपूरचे क्लोजअप आहेत. फार निस्तेज दिसते, डोळ्यांवरून तर आजारी वाटते. ही म्हणजे डोळ्यासमोर असताना फार आनंद/दुःख होत नाही पण पाठ फिरवली की विसरून जाते. कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार वाटतो.   शेवटची एअरपोर्ट 'धमाल' अजिबात जमली नाही. टायमिंग गंडलंय. सिनेमात प्रचंड क्रिंज संवाद आहेत.' द द ठुमका' गाण्याची कोरिओग्राफी अतिशय वाईट आहे. डोहाळजेवणाला बोलवलेले दहा हजार लोक गच्चीवर व अंगणात नाचतात. सर्वांचा आविर्भाव आपण फार काही तरी मजेदार करतोय असा आहे पण प्रेक्षकांपर्यंत काही पोचत नाही. हाकानाका. रणबीर मला रॉकस्टार , अजब प्रेम की गजब कहाणी, बर्फी, ऐ दिल है मधे फार आवडला होता. आवडताच आहे तो, पण आजकाल स्क्रीनवर एनर्जी जाणवत नाही. बोनी कपूर का आहे यात, डिंपल अशात किती काम करते. ब्रह्मास्त्र, पठाण, आणि हे. Weak script, average present...

कोकोनट ट्रेल्स -१ 🥥🌴🌴

इमेज
  14 November 2022 https://youtube.com/@Coconut_Trails कोकोनटचे इन्स्टापेज

कबिरास पत्र

इमेज
  मराठी भाषा गौरव दिन २०२३ निमित्त स.न.वि.वि. या उपक्रमात भाग घेतला होता, त्यात कुणालाही पत्ररूपी लेख लिहायचा होता. यावर्षी मी म भा गौ दि निमित्ताने मायबोलीवर संयोजनातही भाग घेतला होता.  प्रिय कबीरा, तुला काही कल्पना नाहीये इथे काय चाललंय , त्याने माझ्यासारख्या किती जणांचा गोंधळ होतोय. ज्यांना आत्मशोधाची जिज्ञासा आहे त्यांची दिशाभूल करायला इथे सर्वस्व वेचणारी लोक आहेत. असत्याबाबत केवढी एकनिष्ठता, आणि सत्याशी म्हणजे तुझ्या कैवल्याशी काही देणेघेणे नाही. आजकाल आस्तिक कोण नास्तिक कोण कळत नाहीये. बहुतांश जनता इतकी मूर्ख - व्यक्तिपूजक आहे की One Sadguru goes another comes ! सारासार कळणाऱ्यांना तूही असाच असला पाहिजेस असं वाटतं, न कळणाऱ्यांना तुला जाणूनच घ्यायचे नाही. हे म्हणजे अर्धे आंधळे व उरलेल्यांच्या डोळ्यावर पट्टी अशी अवस्था आहे. आता महाभारत झालं तर काय नवल..! त्यांना जीव तोडून सांगायला माझ्याकडे कसलाही पुरावा नाही , माझं काय मी आज आहे उद्या नाही पण तू तर चिरंतन आहेस, तुला काहीच कसं वाटत नाही. दिसामागून दिसं चाललेत, जे आहे त्याला साक्षात्कार का मानू मी तरी! 'तेरे बिन खाली आजा खा...

सर्कस-द्राक्षासव- चित्रपट परीक्षण

इमेज
       रोहित शेट्टीच्या मनाप्रमाणे वागणारा एक वेडसर डॉक्टर व त्याचा सगळ्याला 'हो हो' म्हणणारा तेलकट भाऊ असतो. त्याची कायकी थेअरी असते, ती तो टाईम शेअर पद्धतीने पिळतपिळत आपल्याला सांगत असतो. ती कायकी थेअरी म्हणजे खून क्या रिश्त्यापेक्षा परवरिशचा रिश्ता कायकी घट्टं असतो. तो ठरवतो की गोलमाल मधल्या जमनादास आश्रमातल्या दोन जुळ्यांची अदलाबदल करायची, जी एकाचवेळी जन्मलेली व एकाचवेळी गोलमालाश्रमात आलेली असतात. या सिनेमात सगळं रोहितच्याच मनाप्रमाणे घडतं, आणि रोहितनी ठरवलंय की प्रेक्षकांचे डोके पहिलीला सहामाहीत नापास झाल्याने शाळा सोडलेल्या प्रौढापेक्षाही कैकपट कमी आहे. (संदर्भ #हमाल दे धमाल) त्यामुळे तो त्याला हवे ते दाखवणार व आपण बघून हसणार. त्यामुळे हे रॉय-जॉय बंधूद्वय त्या जुळ्या बाळांच्या दोन सेटची अदलाबदल करतात. हे एकदम १९४२ च्या काळातले दाखवलेयं , मधेच 'भारत छोडो' वगैरेचे नारे व मशाली घेऊन जाणारी लोकं इकडून कायकी तिकडं जातात. त्यांनी सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेत व सिनेमातल्या मेन लोकांनी भडक रंगांचे ओव्हरसाईज सूट व मागून आणलेल्या साड्याब्लाऊज घातलंय. एखाद्या गरीब माणसा...

आप्पेपात्रातली कोफ्ता करी- आफ्ता करी

इमेज
  पूर्वतयारीचा वेळ:  ३० मिनिटे    प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४५ मिनिटे लागणारे जिन्नस:  कोफ्त्यांसाठी : किसलेले पनीर एक वाटी , साधारण पाऊन वाटी चितळे गुलाबजामचे कोरडे मिक्स, किसलेले गाजर अर्धी वाटी, दोन बटाटे उकडून किसून, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, पाच काजू- अर्धबोबडे ,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर , मीठ, चमचाभर तिखट, चमचाभर गरम मसाला , दोन चिमूट कसूरी मेथी. परतण्यासाठी तेल. पत्ताकोबी घरात असूनही लक्षात आले नाही घालायचे. करीसाठी: दोन कांदे, चार टोमॅटो, प्रत्येकी एकएक चमचा आलेलसूण पेस्ट, चमचाभर तिखट,१- २ चमचे गरम मसाला / शाही पनीर मसाला,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर, मीठ, चिमूटभर हळद, दोन तमालपत्रं, अर्धा कप दूध ,अर्धा कप हाफ अँड हाफ. जी अर्धी मलाई असते, त्यातल्यात्यात कमी स्निग्धांश असलेली मलई असते. क्रमवार पाककृती:  कोफ्त्यांसाठी वर दिलेले सगळे घटक एका मोठ्या बोलमधे गोळा करा. हलक्या हाताने मिसळून व मळून गोळे करून घ्या. 'हलक्या हाताने' लक्षात ठेवा कारण हे बेसनाचे लाडू नव्हेत. दाबून मळलेले कोफ्ते गच्च होतात व पोटांत (त्यांच्या) कच्चे रहातात....

सिनेमा आणि मी : भाग १

इमेज
मूळ कमेंट    ॲन्ट मॅन बघितला. तिथे जाऊन नाव माहीत नसल्याने "Three tickets for Ant man and the whatever, please" म्हटले. मार्व्हलच्या परंपरांचे पाईक असल्याने सगळं बघायचं असं तत्त्वं आहे. अशात आलेल्या थॉर पेक्षा बरा व ब्लॅक पॅन्थरपेक्षा फारच बालीश वाटला. मायकल डग्लस उगीच गमती केल्यासारखे करतो, पॉल रड आजन्म कन्फ्यूज दिसतो, मिशेल फायफर सतत ओढल्यासारखा चेहरा व विचकटलेले केस घेऊन वावरते. तीस वर्षे क्वांटम मधे अडकून काय घडले हे तिने घरी सांगितलेलं नसतं. व्हिलन चांगला होता पण त्याचे संवाद फार साधारण होते. मधेच तो साऊदिंडियन सिनेमातल्या विष्णूसारखा निळा व्हायचा. त्याचं विमानाचं काही तरी फायफरताई दुरुस्ती करते म्हणून तोडून वर सिरम सांडून टाकतात. त्याला बऱ्याच विश्वांचा व टाईमलाईनचा सत्यानाश करायचा असतो, मग त्याला येतो राग ! येणारच नं , दळण आणायला गेलो आणि लाईट गेले एवढं सोपं थोडीच आहे. तिचा राग म्हणून तिच्या नातीला एका गुंडांच्या मदतीने जो रोबो-हम्प्टीडम्प्टी सारखा दिसतो, ओलीस धरून पॉल- जावयाला त्याच्या DNA मुळे सोडतात. हे मला कळलं नाही सासू आणि जावई DNA , असो. मग त्याचे तिथे रिप्लिका ...

सच कहुं तो- नीना गुप्ता : थोडा परिचय -थोडं चिंतन

इमेज
  ह्या पुस्तकाविषयी ऐकलं होतं, पण वाचनाच्या बाबतीत अचानकच रस वाटणं बंद झाल्याने हे आणि इतरही बरीच पुस्तकं मागेमागे पडत गेली. एकदातर ह्या पुस्तकाची १०० पानं पंचेचाळीस मिनिटात वाचली, 'पानं मोजणं' कधी करेन वाटले नव्हते. पण मी त्या अ-वाचकाच्या गर्तेतून बाहेर पडतेयं हेही थोडके नाही. तरीही पूर्वीचा 'राक्षस' परत हवायं. जयश्री गडकरचे 'अशी मी जयश्री' सोडून मी याआधी कुठलेही सिने किंवा नाट्यसृष्टीतल्या लोकांचे आत्मचरित्र वाचलेले नव्हते. दादा कोंडकेचे 'एकटा जीव' आईने सुचवले होते, तेव्हा 'ती तूच आहेस का, जिने मला दादा कोंडकेचा एकही सिनेमा बघू दिला नाही' झाले होते !! एवढंच नाही तर तिने 'फडके - अर्नाळकर' पण गाठोड्यात घालून भिंतीतल्या कपाटात वर टाकून दिले होते. हे सांगायचं कारण की नीनाच्या आईने पण 'लडकी बिगड़ जायेगी' या भीतीपोटी अपार कष्टं घेतले होते. ती तिचं 'बिघडली', आपण आपलं बिघडू.  नीनाच्या प्रेमप्रकरणांमधल्या संभाव्य 'रसाळ' तपशीलामुळे ते पुस्तक हातोहात खपलेही/खपतंही असेल. तिने व्हिवियनची, मसाबाची, सर्वांचीच प्रायव्हसी जपण्यास...