ऑपनहायमर
ऑपनहायमर.... ऑपनहायमर बघून आले, सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. व्यक्तिशः भूतकाळ-वर्तमानकाळ अशा कथेतल्या उड्या मला त्रासदायक वाटतात. तरीही समजला . आईनस्टाईनचे पात्र मुद्दाम डिटॅच वाटले.त्याच्या सापेक्षता सिद्धांताच्या पुढची पायरी म्हणावे असं हे संशोधन होते. त्यामुळे पुढं काय होऊ शकते याची त्याला जाणीव असल्याने तो त्रयस्थ दाखवला असावा. एफबीआईने ऑपनहायमरला देशद्रोही ठरवतानाचा कोर्टरूम ड्रामा भलता लांबला आहे. मला हिरोशिमा आणि नागासाकी मधला हल्ला दाखवतील असं वाटलं होतं पण न्यू मेक्सिको मधली चाचणी तपशीलवार दाखवली आहे. नंतर फक्त डॉ ऑपनहायमर यांच्या हावभावावरून घटनेची तीव्रता पोचवली आहे. तो असह्य ताण किलियन मर्फीने फार चित्रदर्शी दाखवला आहे. सुरवातीला दिसणारी निरनिराळे दृष्टांत/ व्हिजन्स याने तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे लक्षात येते. मॅट डेमन मला ओबडधोबड वाटतो पण इथे सूट झालाय. दोन्ही नग्न दृश्यं थोडी अनावश्यक वाटली व तेव्हाच गीतेतले संहारावरचे श्लोक म्हणायचे प्रयोजन कळले नाही. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचं कामही अप्रतिम झाले आहे. तो मला आवाजावरून ओळखायला आला, इतकं बेमालूम जमलं आहे. स्त्रियांना...