पोस्ट्स

आप जैसा कोई

इमेज
  आप जैसा कोई (नेटफ्लिक्सवर) माधवन, फातिमा सना शेख, नमित दास, आयेशा रजा, मनिष चौधरी हा नावावरून क्रिंज आणि ट्रेलरवरून फार काही खास किंवा नाविन्यपूर्ण नसलेला वाटला होता. सहज 'वर्क आऊट' करताना लावला आणि याने खिळवून ठेवले. संपूर्ण पाहूनच उठले. 'आप जैसा कोई' ऐवजी 'आज जाने की जिद ना करो' नाव ह्यातल्या रोमॅन्ससाठी चपखल ठरले असते.‌ इतका vintage आणि हुरहूर लावणारा आहे. माधवन(श्रीरेणू त्रिपाठी) एक ४२ वर्षे वय असलेला संस्कृतचा शिक्षक आहे. लग्न जमत नाहीये, कुणालाच तो इंटरेस्टिंग वाटत नाही. फातिमा (मधू बोस) एक ३२ वर्षांची फ्रेंचची शिक्षिका आहे. नमित दास मित्राच्या भूमिकेत आहे, फार भारी काम करतो आणि अंडररेटेड वाटतो. आयेशा रजा एकदम गृहकृत्यदक्ष, आई एवढा जीव लावणारी मायाळू वहिनी व मनिष चौधरी इतरांना ताब्यात घेणारा एकदम पुरूषसत्ताक विचारांचा मोठा भाऊ आहे. मधू बोसचे कुटुंब एकदम प्रेमळ आधुनिक विचारांचे कलकत्त्यातील टिपिकल बंगाली कुटुंब आहे. माधवनचे कुटुंब आगरतळा व जमशेदपूरचे दाखवले आहे. मुंबई, दिल्ली, पंजाब, युपीही न दाखविल्याबद्दल टिमचे कौतुक. श्री प्रचंड एकलकोंडा, लाजाळू व इंट्...

द ओव्हरकोट - निकोलाय गोगोल

इमेज
  एक अतिशय बिनमहत्त्वाचा माणूस असतो.‌  Akaky Akakievich Bashmachkin  त्याचं नाव. हे नाव रशियन भाषेत सुद्धा महत्त्वाचे नाही. 'अकाकी' जणू एकाकीच. अकाकी जेव्हा त्याच्या आईच्या पोटी आला, सचोटीने वागणारी, पापभिरू बाईच ती. हा जेव्हा तिच्या पोटी आला तीन वेगवेगळ्या गॉडपेरेंट्सनी सुद्धा तिला धड नावं सुचविली नाहीत. मग तिने देवाचा धावा केला म्हणजे चर्चमधे विचारले तर तेथे तर त्याहीपेक्षा विचित्र नावं सुचविली गेली. जणू अकाकी देवासाठी सुद्धा बिनमहत्त्वाचा. शेवटी या नावांपेक्षा तिच्या बाळाला त्याच्या बाबाचे नाव देऊन मोकळी झाली. अकाकीचे नाव सुद्धा संपूर्णपणे त्याचे नाही. हा असा अकाकी आयुष्यभर गरीब व अदृष्यच राहिला. गोगोलना त्याला पर्सनॅलिटी न देता कथेचा नायक केले आहे. मुन्शी प्रेमचंदच्या कथांशी मिळतीजुळती दुःखद कथा आहे असे वाटतावाटता ती अंताकडे अद्भूत व अमानवीय होऊन जाते. अकाकी- अतिशय सामान्य काहीशा ओबडधोबड रूपाचा, बुटका- मध्यमवयीन माणूस आहे. सेंट पिटर्सबर्ग या रशियातील शहरात एका सरकारी विभागात कारकून आहे. ह्या विभागाचं नाव न गुप्त ठेवण्याची दहा कारणं सांगितलीत गोगोलने. ब्यूरोक्रॅटिक #ल...

मराठी भाषा गौरव दिन २०२५ - शब्द

इमेज
  माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हि च्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !    /\ https://www.maayboli.com/node/86385 माझे आजोबा मला म्हणायचे "वाणी प्रसन्न आहे तुझ्यावर, सुपारी खात जाऊ नकोस. शारदेला रुष्ट करू नकोस." वाणी म्हणजे नेमकं काय हे आताही कळालेलं आहे की नाही माहीत नाही. वाणी म्हणजे आपल्या मुखातून (किंवा लेखनातून) बाहेर येणाऱ्या शब्दांतील ऊर्जा असावी... कदाचित. आणि शब्द.... सगळीकडे विखुरलेले, आपल्या अवतीभवती भिरभिरणारे, कधी सुई तर कधी काट्यासारखे बोचणारे, कधी मऊसुत वाटणारे, कधी दिलासा देणारे, कधी आपले वाटले नाही तरी रूंजी घालणारे, बोलायलाच हवेत असेही नाही -लिहिले तरी पोचणारे. कधी परस्पर वाहणाऱ्या ढगासारखे पाऊस न पाडताच निघून जाणारे, कधी स्वतःचा अर्थ आपल्याला शोधायला भाग पाडणारे, मनातल्या काहुराला वाट करून देणारे..! शब्द बापडे केवळ वारा अर्थ वागतो मनांत सारा नीटनेटका शब्द पसारा अर्थाविण पंगू भाषा कुठलीही असो, आपली भाषा आपल्याला शब्द देते. ते शब्द आपल्याला विचारांची चित्रं काढणारी रंग देऊन जातात. ज्याचा शब्दसंग्रह जास्त त्या...

जाट

इमेज
  जाट साधारण अर्धा पाहिला. सतत मारामारी आहे, सतत. चित्रपट कुठेच नाही फक्त मारामारी. कथा कुठेच नाही फक्त मारामारी. शंभर माणसांच्या पनीरच्या भाजीत पनीरचा एक तुकडा टाकून बाकी ग्रेव्ही वाढत 'हे घ्या पनीर' चा आव आणला आहे. संपूर्ण चित्रपट साऊथचाच आहे. त्यामुळे विचित्र पेट्रियार्कीची परंपरा आहे, सारखं स्त्रियांना विवस्त्र करून त्यांचा अपमान करण्याचे सीन आहेत. पोलिस असलेल्या स्त्रियांना सुद्धा विवस्त्र केले आहे, चित्रपट तेथूनच सुरू होतो. साऊथच्या सिनेमात स्त्री प्रेक्षकांना ऑकवर्ड करणारे पण सन्मान देतोय असं भासवणारे सीन्स देण्याची पद्धत आहे. हिरोला महानायक करण्यासाठी त्यांनी त्याची परंपरा केली आहे. जी किळसवाणी वाटते. 'पुष्पा' हा एक महामूर्ख सिनेमा होता. त्यात पुष्पाने व्हिलनला मारताना 'औरतोकी इज्जत करते है' वर प्रवचन देऊन नंतर रश्मिकाला त्याच्याकडे बघून हसण्याचे पाच हजार दिले होते. हे इतकं दर्जाहीन आहे की ज्याचं नाव ते. पण त्यांच्या आदराच्या व्याख्या हुकलेल्या आहेत. पुन्हा जाट - हा ट्रेकिंगला या साऊथच्या गावात आलेला आहे म्हणे. आधी तो दालरोटीच विचारतो धाब्यावर. त्यातल्या...

काला पत्थर

इमेज
  काल 'काला पत्थर' शेवटची अठ्ठावीस मिनिटे सोडून पाहिला. त्यात संजीव कुमार, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, राखी, परविन बाबी, नीतू सिंग एवढी दणदणीत स्टार कास्ट आहे. शत्रुघ्नचे बरेचसे संवाद "बाळ - राकु" गटात येणारे वाटले. मंगलका खून कोई ऑरेन्ज कोला (?) नहीं है, जो विजय एक झटकेमें पी जाये. एकदम राकु रिअलायझेशन झाले पण राकु सारखे कोणी नाही. गुण, बुद्धी, रूप, प्रतिभा, सुडौल बांधा, काहीकाही नाही पण शून्य आत्मभान व त्यामुळे येणाऱ्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे साक्षात दैवी रूप म्हणजे राकु. त्यामुळे शत्रु फक्त भक्त वाटतो, देव नाही. अमिताभचे संवाद तर जीएंच्या व्यक्तिरेखांचे संवाद वाटावेत इतके विमनस्क व हताश आहेत. त्याचा पूर्वेतिहास - एका जहाजाचा कॅप्टन असतो ते जहाज दुर्दैवाने बुडताबुडता वर येऊन बसते, त्याने ह्याचे आपल्या जहाजाला सोडून दिलेला भ्याड कॅप्टन म्हणून कोर्ट मार्शल होते व तो जीए- धर्म स्विकारून एकदम शब्दशः 'भूमिगत' होऊन कोळशाच्या खाणीत मजूर होतो. हमारी कश्ती वहां डुबी जहाँ पानी कम थाच्या- उलट हमारी कश्ती वहां आपोआपच बाहर आई जहां पाणी का वावटळ था.  शशी कपू...

Transcendence

इमेज
  Transcendence (Prime) ( Trailer ) Johnny Depp, Rebecca Hall, Morgan Freeman, Cillian Murphy जॉनी डेप हा नॅनो टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला जगप्रसिद्ध वैज्ञानिक आहे. त्याची 'पार्टनर ईन सायन्स' आणि 'पार्टनर ईन लाईफ' रेबेका सुद्धा त्याची त्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात साथ देते. प्रत्यक्षात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मात्र ती फिलियांथ्रॉपिस्ट विचारांची आहे. तिच्या महत्त्वाकांक्षा मात्र जग अजून सुखी कसे होईल, पर्यावरणात समतोल कसा येईल, लोकांचं आयुष्य अजून सोयीचं कसं होईल- अशा असतात. त्याच्या महत्वाकांक्षा ह्या- तो अजून कसा आंतरजाल, टेक्नॉलॉजी व स्टेम सेल रिसर्च मधे पुढे कसा जाईल अशा आहेत. त्यांचा एक फिलॉसॉफीकल विचारांचा दुसरा प्रोग्रामर मित्रंही आहे. ह्या तिघांची एक कंपनी आहे, ज्यात मॉर्गन फ्रिमन गुंतलेला आहे आणि गोवर्नमेंट ऑफिशियल आहे. हा प्रकार हाताबाहेर जातो आहे म्हणून एक ॲन्टि -टेक्नॉलॉजी/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेरिरिस्ट ग्रूप याच्यावर गोळीबार करतो. सुरवातीला तेच खलनायक वाटतात पण नंतर त्यांचेही चूक नव्हते असे वाटते. त्यांच्या गोळीबारात जॉनी डेपला ...

Blood Diamond

इमेज
  ब्लड डायमंड - प्राईमवर पाहिला. Leonardo DiCaprio, Jennifer Connelly, Djimon Hounsou प्राईमवरून जात आहे व पाच ऑस्कर नामांकन मिळालेली दिसल्याने पाहिला. सिएरा लिओन सिव्हिल वॉरच्या काळात तेथील दहशतवाद्यांनी तिथल्या सामान्य जनतेला गुलामासारखे वागवून हिऱ्यांच्या खाणीतून हिरे - ओबडधोबड, न तासलेल्या स्वरूपातील काढून घेण्यासाठी भयंकर अन्याय व शोषण केले जाण्याची कथा आहे. कथा आणि अभिनय जबरदस्त आहे. भयंकर वेगवान पॉलिटिकल वॉर थ्रिलर आहे. त्या शोषित जनतेने मत देऊ नये व तिथली सत्ता बदलू नये, गुलामगिरी, अन्याय व हिऱ्यांचा गैरव्यवहार असाच चालू रहावा म्हणून एकेकाचे हात तोडून टाकलेले सीन आहेत. भयंकर अंगावर येणारा सिनेमा आहे. त्रासदायक बाब म्हणजे हे खरेच असले पाहिजे असे वाटून क्लेश होतात. सगळी सप्लाय चेन अशी बनवली आहे की ज्यांचे शोषण होते त्यांना वाचा उरली नाही, सगळे अव्याहतपणे सुरू रहावे म्हणून संपूर्ण जगातील लोक याकडे दुर्लक्ष करतात. जेनिफर कॉनली (मेरी बॉवेन्स) नावाची अमेरिकन जर्नलिस्ट आहे. लिओ एक स्वतःचे आईवडील नवव्या वर्षी बलात्कार व मुंडके उडवलेले बघितल्याने- यातच मोठा झालेला प्रसंगी निर्ढावलेल...