पोस्ट्स

सिनेमा आणि मी : भाग १

इमेज
मूळ कमेंट    ॲन्ट मॅन बघितला. तिथे जाऊन नाव माहीत नसल्याने "Three tickets for Ant man and the whatever, please" म्हटले. मार्व्हलच्या परंपरांचे पाईक असल्याने सगळं बघायचं असं तत्त्वं आहे. अशात आलेल्या थॉर पेक्षा बरा व ब्लॅक पॅन्थरपेक्षा फारच बालीश वाटला. मायकल डग्लस उगीच गमती केल्यासारखे करतो, पॉल रड आजन्म कन्फ्यूज दिसतो, मिशेल फायफर सतत ओढल्यासारखा चेहरा व विचकटलेले केस घेऊन वावरते. तीस वर्षे क्वांटम मधे अडकून काय घडले हे तिने घरी सांगितलेलं नसतं. व्हिलन चांगला होता पण त्याचे संवाद फार साधारण होते. मधेच तो साऊदिंडियन सिनेमातल्या विष्णूसारखा निळा व्हायचा. त्याचं विमानाचं काही तरी फायफरताई दुरुस्ती करते म्हणून तोडून वर सिरम सांडून टाकतात. त्याला बऱ्याच विश्वांचा व टाईमलाईनचा सत्यानाश करायचा असतो, मग त्याला येतो राग ! येणारच नं , दळण आणायला गेलो आणि लाईट गेले एवढं सोपं थोडीच आहे. तिचा राग म्हणून तिच्या नातीला एका गुंडांच्या मदतीने जो रोबो-हम्प्टीडम्प्टी सारखा दिसतो, ओलीस धरून पॉल- जावयाला त्याच्या DNA मुळे सोडतात. हे मला कळलं नाही सासू आणि जावई DNA , असो. मग त्याचे तिथे रिप्लिका

सच कहुं तो- नीना गुप्ता : थोडा परिचय -थोडं चिंतन

इमेज
  ह्या पुस्तकाविषयी ऐकलं होतं, पण वाचनाच्या बाबतीत अचानकच रस वाटणं बंद झाल्याने हे आणि इतरही बरीच पुस्तकं मागेमागे पडत गेली. एकदातर ह्या पुस्तकाची १०० पानं पंचेचाळीस मिनिटात वाचली, 'पानं मोजणं' कधी करेन वाटले नव्हते. पण मी त्या अ-वाचकाच्या गर्तेतून बाहेर पडतेयं हेही थोडके नाही. तरीही पूर्वीचा 'राक्षस' परत हवायं. जयश्री गडकरचे 'अशी मी जयश्री' सोडून मी याआधी कुठलेही सिने किंवा नाट्यसृष्टीतल्या लोकांचे आत्मचरित्र वाचलेले नव्हते. दादा कोंडकेचे 'एकटा जीव' आईने सुचवले होते, तेव्हा 'ती तूच आहेस का, जिने मला दादा कोंडकेचा एकही सिनेमा बघू दिला नाही' झाले होते !! एवढंच नाही तर तिने 'फडके - अर्नाळकर' पण गाठोड्यात घालून भिंतीतल्या कपाटात वर टाकून दिले होते. हे सांगायचं कारण की नीनाच्या आईने पण 'लडकी बिगड़ जायेगी' या भीतीपोटी अपार कष्टं घेतले होते. ती तिचं 'बिघडली', आपण आपलं बिघडू.  नीनाच्या प्रेमप्रकरणांमधल्या संभाव्य 'रसाळ' तपशीलामुळे ते पुस्तक हातोहात खपलेही/खपतंही असेल. तिने व्हिवियनची, मसाबाची, सर्वांचीच प्रायव्हसी जपण्यास

व्हेज ग्रीन थाई करी

इमेज
  पूर्वतयारीचा वेळ:  ३० मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १ तास लागणारे जिन्नस:  करीच्या वाटणासाठी : २ पेरं ओली हळद, ४ पेरं गलांगल(थाई आले),दोन काड्या लेमनग्रास, ५-६ हिरव्यागार मिरच्या, प्रत्येकी चमचाभर पांढरे मिरे, जिरे, धने, ७-८ कोथिंबीरीच्या काड्या, २-३ सांबारचे कांदे, ६-७ पाकळ्या लसूण, एका पूर्ण केफिर लाईमची सालं (पांढरा भाग न येऊ देता). बाकीचे : १ लिटर नारळाचे दूध, मशरूम, मध्यम आकारात चिरलेली- प्रत्येकी अर्धी वाटी लाल-हिरवी शिमला मिर्ची , ब्रॉकोलीचे तुरे, गाजराच्या चकत्या, बाळ कणसं,थाई बेझिलची ५-६ पाने क्रमवार पाककृती:  क्रमवार पाककृती * १. वाटणाचे घटक मिक्सर मधून घूरकावून घ्या. निन्जा बिनपाण्याचे करत नाही म्हणाले, म्हणून अर्धीवाटी पाणी घातले. त्यात माझी लेमन ग्रास जून/निबर निघाली, त्यामुळे थोडे जास्तच फिरवले. आर्टिफिशय इंटलेक्टचे निन्जा लईच आगाव हाय, चटणी झाली समजून मनानंच कुटणं थांबवतं. त्याला खवट सासू नव्या सुनेला ज्या प्रेमाने समजावते तसं किंवा 'मोटा शाणा झाला का बे' म्हंणत, ओव्हरराईड करत ओल्या नारळाच्या चटणीसारखी चटणी करून घेतली. * संज्याेतनी गलांगल व हळदीची सालं काढली

ब्रह्मास्त्र -मोठ्यांचा 'छोटा भीम'

इमेज
  'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच. अमिताभचे नाव 'रघू' आहे , मला फिस्सकन हसू आलं. त्याला 'रघूगुरु' असं एकदोनवेळा म्हटलेलं, मला 'लघुगुरु' सारखं ऐकू आलंय. ह्याने फक्त औपचारिकता म्हणून हजेरी नोंदवली आहे. तो वेगवेगळे जॅकेट घालून 'लँड्स एन्डची' जाहिरात असल्यागत मिरवताना, फक्त प्रीतिभोजासाठी लग्नाला तयार होऊन आलेल्या दूरच्या नातलगासारखा वाटतो. ('आजोबा उठा, सुन्मुखाची वेळ झाली.' आजोबा कशाचे उठतात , प्रीतिभोजानंतर डायरेक्ट विहिण पंगतीला उठायचे ठरवूनच झोपलेले असतात. हे खरे वानप्रस्थ !) यांचे आश्रम हिमालयाच्या पायथ्याशी असून मागून मोकळे व 'सुरक्षिततेसाठी' समोरून कुलूपबंद आहे. हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय , तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे. त्यामुळे व्हिलन यायचे तेव्हा येतातच, हिरो मात्र कुलूपाशी झगडत बसतो. मौनी रॉयच्या गळ्यावर कांजण्या आल्यासारखी चित्रं गोंदवलीत. मौनी दंडाला पेडोमिटर लावून हिंडल्यासारखं अस्त्राचा तुकडा लावून फिरते, हे जेव्हाजेव्हा लाल होतं, तिचे डोळेही लाल होतात. जसं फोनवरचा मेसेज अॅपल वॉचवर

शेरदिल-द पीलीभीत सागा अर्थात नरो वा शार्दूलो वा- वाघ का माणूस

इमेज
     (#स्पॉयलर्स असतील) न सके तो सुन मन गुंज हो अलख जगा मन स्वयं स्वयं में मन मुस्कावे जिव भूलकावे पीको प्रेम ज़रे लाज ना लागी हां जो जागी बदली जे ही घडी मोह में बांधे सधे ना साधे चुलबुल चित धरे माया खेला है अलबेला खुल खुल खेल करे मन अंतर तू जा ढूंढ सुन सके तो सुन मन गुंज हो अलख जगा मन स्वयं स्वयं में https://youtu.be/GuuOrsKoJWY अरे मुठ्ठी मुठ्ठी बोइदे मुठ्ठी मुठ्ठी बोइदे अरे मुठ्ठी मुठ्ठी बोइदे बीजा अरे माटी मांगे बूटा बोइदे रे भैया अरे बूटा बूटा बोइदे उगाइदे रे भैया बूटा बूटा उगने दे रे बूटा बूटा उगने दे भूमि अपनी मांगे रे मांगे उसके गहने रे पत्ता पत्ता बूटा बूटा जंगल जंगल रहने दे जंगल मांगे धुप पानी धुप पानी बहने दे. https://youtu.be/f0JfvWsY7k0 आताच शेरदिल :द पीलीभीत सागा बघितला नेटफ्लिक्सवर. तुकड्यातुकड्यांतल्या विचारांचा वर्षाव झाला. दिशाहीन भरकटीतून योग्य मार्ग जरी सापडला नाही तरी निदान अयोग्य मार्गाची जाणीव होते असा काहीसा प्रवास हा सिनेमा बघताना होतो. कथाबीज सत्यघटनांवर आधारित आहे. गरीब शेतकरी, विषमता, गरिबीला कंटाळून केलेल्या आत्महत्या हा विषय काही आपल्याला नवीन नाही. उलट अशा

टेस्ला गं बाई टेस्ला

इमेज
  टेस्ला गं बाई टेस्ला आमच्याकडे एक बरीच जुनी मळकट कार आणि एक थोडी जुनी बेढब वॅन आहे. या दोन्हीही मी नियमित चालवत असते. पण दोन तीन वर्षात आमच्या नेबरहूडात हळूहळू सगळ्या टेस्ला दिसायला लागल्यात.   किंवा साधुसंतांना सगळीकडे जसा ईश्वर दिसतो तशा मला ह्याच दिसत असतील. मागच्या वर्षीपासून तर ड्रायव्हिंग करताना दर तीन मिनिटाला एक टेस्ला बाजूने सुळकन निघून ही जाते. आणि मला आपोआपच हीन भावना येते. कसं ते सांगायला '3 ईडियट्स' मधल्या रँचो सारखा डेमो देते. त्याशिवाय काही ही हीन भावना तुमच्यापर्यंत पोचणार नाही.         शेजारशेजारच्या दोन थेटरात दोन सिनेमे लागलेत , त्याचे पोस्टर बाहेरच्या भिंतीवर लावलेय. एकात 'गहराईयां'ची दीपिका पडूकोण तर दुसऱ्यात कुठल्याही सिनेमाची काकुळतीला आलेली निरूपा रॉय आहे. कल्पना करा, निरूपांच्या सिनेमाचे तिकीट पन्नास रुपये व दीपिकाच्या सिनेमाचे हजार आहे, आणि तुमच्याकडे पंचवीस रूपये आहेत तर तुम्हाला सिनेमाला न जाताही हीन भावना येईल. शिवाय घरी येऊन टिव्ही बघावा तर एक-दोन वाहिन्यांवर 'आमची माती-आमची माणसं' लागलेलं असंल, तर जे काय मनात तयार होईल. ती हीच

काही गाणी आणि आरस्पानी

इमेज
       काही गाणी आणि आरस्पानी     बन लिया अपना पैगंबर    तैर लिया सात समंदर    फिर भी सुखा मन के अंदर    क्यों रह गया    रे कबिरा मान जा....    रे फकिरा मान जा..   आजा तुझको पुकारें तेरी परछाईंया     साप जसा कात टाकतो तशी मी लिहिते,  दुसरी इतकी चपखल आणि क्रीपी उपमा याक्षणी तरी आठवत नाही. काही तरी साचल्यासारखं वाटतं , व्यक्तं झालं की मोकळं होऊन आपापल्या मार्गाला जाता येतं. सापाला त्याचाच भाग असलेल्या काती विषयी काही विशेष आसक्ती वाटत नाही पण मुक्तताही हवी असते आणि सक्तीही नको असते, तसंचं काहीसं होऊन बसतं, बहुतेक मी विचित्र आहे, माझा प्रवास आरस्पानी असावा एवढाच आग्रह आहे !     प्रवासात काही का येईना सगळी बेटंच आहेत, ध्रूवपद नाही, हे कळाल्याने बहुदा बऱ्याचशा गोष्टी 'whatever' गटात गेल्यात. भारतातून परत येऊन तीन महीने होतील, यावर वैयक्तिक न होता लिहावं असं वाटलं. पण पझलचे हजारो तुकडे एकदाच अंगावर पडल्यावर कसं लिहिणार. जे मलाच कळत नाहीये ते कसं बांधणार, वाचणाऱ्याला कसं समजणार !!! अधिकतर आठवणी स्मृती होतात, काही आपलाच अंश होऊन पुनःप्रत्ययाचे ecstatic झटके देत रहातात.     बंध