पोस्ट्स

The fall of the house of Usher

इमेज
  'Maybe' Spoiler alert**** नेटफ्लिक्सवर  The fall of the house of Usher  बघितली. एडगर ॲलन पो यांच्या संकलित गूढ कथांना एकत्र करून तयार केलेले कथानक व Mike Flanagan याचं दिग्दर्शन आहे. प्रचंड खिळवून ठेवणारी, अनप्रेडेक्टिबल, गूढ, कुठंकुठं अभद्र आणि भयंकर आहे. सर्वांची कामं जबरदस्त झाली आहेत. एका अनौरस बहिणभावांवर- Madeline Usher आणि Roderick Usher झालेला अन्याय, जिजसवर अंधविश्वास ठेवून औषधं न घेता तिळातिळाने झिजून मरणारी आई, माणुसकी नसलेले वडील, समाजात नसलेले स्थान -अशी पार्श्वभूमी असलेले ते दोघे अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. त्यात बहिणीचे पात्र अतिशय धूर्त , मतलबी व बुद्धिमान आहे. वैचारिक स्पष्टता असलेले नकारात्मक स्त्री पात्र खूप दिवसांनी बघायला मिळाले. तिनं अमेरिकन आयुष्यावर व त्यातील औषधी कंपन्यांच्या गुंत्यावर बोलून दाखवलेलं भाष्य तर फारच चपखल वाटलं. ३१ डिसेंबरला रात्री एका समांतर विश्वात असलेल्या पबमधे जातात, तिथल्या मृत्यूदेवतेला(Metaphysical -gothic entity) स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काही वचनं देऊन बसतात. नंतर बाहेर येऊन हे गूढ ते विसरून जातात. त्यानंतर जवळजवळ पन्नास ...

फराळाचा PTSD कसा द्यायचा?

इमेज
एखाद्या धक्कादायक घटनेनंतर मनात त्या अनुभवाची एक भीती बसते, त्याला PTSD (post traumatic stress disorder) म्हणतात. ---------------- आपण केलेल्या गोष्टी/चांगलेचुंगले / मेहनतीने केलेल्या पाककृती विसरून जाणारा किंवा 'रिप्लेस मेमरी' असणाऱ्या नवरा असलेल्या मैत्रिणींना समर्पित....  एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला. तेव्हापासूनच काही आयडिया हाताशी ठेवल्यात... फक्त मुलींसाठी.  फराळाचा PTSD कसा द्यायचा?    1. कच्च्या मालासाठी वेगवेगळ्या दुकानात पळवायचं, तरी उणिवा काढून किरकिर करायची. उदा. रवा/पोहे जाड/ पातळ/ बारीक, खोबरं- शेंगदाणे खवट. 2. शंभर मेसेज-फोन करून जास्तीत जास्त महत्त्व अधोरेखित करायचं. सारखं 'कुठपर्यंत झालं' विचारत रहायचं . किराणा खरेदीत झालेल्या चुकांवर खूप हताश होऊन सुस्कारे सोडत रहायचं. 3. आठ दिवस आधीपासूनच शॉर्टकट स्वैपाक करायचा, का विचारलं तर मोठ्याने 'फ रा ळ' एवढंच म्हणायचं. फराळाच्या रुखवतापैकी काहीनंकाही डायनिंग टेबलवर मांडून ठेवायचं व वातावरणनिर्मिती करायची. उदा....

ड्रीम गर्ल २

इमेज
 <strong>ड्रीम गर्ल २ नेटफ्लिक्स</strong> आयुष्मान खुराणा, अन्नु कपूर ,परेश रावल, अभिषेक बॅनर्जी, अनन्या पांडे, असरानी, मनोज जोशी, राजपाल यादव, सीमा पहावा, विजय राज. जमला नाही, फार कंटाळवाणा कधीमधी सवंग व ओढून ताणून वाटतो. ड्रीम गर्ल १ उथळपणाला 'खो' देऊन परत आला होता पण धमाल होता. मला आवडला होता, आयुष्मानला मध्यमवर्गीय पात्राचा विनोद सही सही पकडता येतो. जो उच्छृंखल असला तरी चलाख असल्याने उथळ वाटत नाही. इथे ती पकड सगळ्यांचीच सुटली आहे. परेश रावल किती दिवसांनी दिसला, बरं वाटलं पण भूमिका गुळमुळीत आहे. अन्नु कपूर अतिशय उत्तम काम करतो पण इथं लक्षात रहात नाही. तसं सगळ्यांनाच अनन्या पांडे चावली असावी, त्यामुळे एवढी तगडी स्टारकास्ट असूनही सर्वांचीच कामं विस्मरणीय झालीत. आक्षेपार्ह नोंद म्हणजे अन्नु कपूरचे पात्र कर्ज फेडण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी मुलाला मुलगी करून बार गर्ल व्हायची गळ घालतो, नंतर हे प्रकरण उगाचच वाढवत नेले. बरं चीप तर चीप करकचून विनोद तरी करावेत तेही नाही, गाणी तर फारच बंडल. शेवटचं आयुष्मानचं 'प्यार तो प्यार होता है' हे सगळ्यांना दिलेलं प्रवचन तर का...

रॉकी और राणीकी 'कायकी' प्रेमकहाणी

इमेज
  काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो. पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं आजोबांच्या. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडते. एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं ना...

कोकोनट ट्रेल्स -२ 🥥🌴🌴

इमेज
  कोकोनटचे इन्स्टापेज कोकोनटचे इन्स्टापेज आमचा कोकोनट (कसाबसा)पास झाला. परिक्षेच्या दिवशी टाय व डिग्रीची हॅट घालून अभ्यास न करता गेलो होतो. सगळा भर टिपटॉप रहाण्यावर होता.   मला निळा रंग आवडतो म्हणून मी त्याचं सगळं निळ्या रंगाचं घेते. आधी काळं हार्नेस होते, एकदम रुबाबदार ऑफिसर सारखा दिसायचा. वॉकला जाताना त्याला आम्ही FBI चं वेस्ट घाला म्हणायचो. ते लहान झाल्यावर हे निळं आणलं, आता ॲस्ट्रॉनॉटचं वेस्ट घाला म्हणतो. कॉलरही निळी आहे त्यावर त्याचं नाव आणि माझा फोन नंबर कस्टम केला आहे. मी भाजी चिरताना,इतकी उत्सुकता आहे. मला बघत खाऊच्या आशेने स्वयंपाकघरात. मी टाचा दुखू नयेत म्हणून आणलेली मॅट त्याला वाटते त्याला आरामात बसून मला बघता यावे व खायला मागावे याच्यासाठी आणली आहे.  तपकिरी डोळ्यांचे संमोहन..! आम्हाला कंटाळला की कोकोनट देवघरासमोर जाऊन झोपी जातो. आम्ही खूप कलकलाट केला की हे असं  आमचं बाळ ताईच्या भावलीला घाबरून पळत क्रेटमधे जाऊन बसलं. भावलीला हाताने नाचवून मी 'हॅलो कोकोनट ' म्हटलं की फारच घाबरगुंडी उडाली. काल राखी पौर्णिमा साजरी केली तेव्हा कोकोनटलाही ओवाळलं. त्याला औक्षण ...

Red, White and Royal blue

इमेज
  Red , White and Royal blue 💙💙 गे-बाय असलेल्या दोन तरुण मुलांचा अगदी फेअरी टेल रोमॅन्स आहे. जो प्रथमच इतका सुंदररित्या चित्रीत करण्यात आला आहे. अमेरिकन लेडी प्रेसिडेंटचा मिश्रवर्णी मुलगा ॲलेक्स (Taylor Zakhar Perez) आणि ब्रिटिश ड्यूक प्रिंस हेन्री (Nicholas Galitzine) एकमेकांच्या प्रेमात पडतात व काय काय घडू शकते व काय घडू शकण्यास विघ्न येऊ शकतात याची कथा. ट्रान्स वुमन बॉडी गार्ड, स्त्री प्रेसिडेंट(उमा थर्मन), मोनार्कीचा दबाव, अमेरिकन इलेक्शनचं प्रेशर, वेगळ्या रंगाची जवळची मैत्रीण, देशी रॉयल असिस्टंट हे सगळं एकत्र करून कथेला जास्तीत जास्त नॉर्मल केले आहे. लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक लोकांच्या आयुष्यात सेक्शुअल ओरिएंटेशन सोडलं तर ती इच्छा,आकांक्षा, स्वप्न, भावनिक जवळीक अशा सर्व बाबतीत ती अगदी इतरांसारखीच असतात हे नॅरेटिव्ह अगदी खरं असल्याने , शिवाय इतक्या प्रसन्न शैलीत मांडलेलं असल्याने खूप आवडलं. हे नॅरेटिव्ह वारंवार आलं तरच स्वीकार वाढून हे नॉर्मलाईज होणार. तेवढं वगळलं तर ख्रिसमसच्या आसपास येणाऱ्या कुठल्याही प्रिन्सेस मुव्ही सारखा आहे. ह्यात रेशिअल, थोडीफार जेंडर न्यूट्रॅलिटी आणि...

बंदिवान मी ह्या संसारी

इमेज
बंदिवान मी ह्या संसारी <a href="https://en.m.wikipedia.org/wiki/Bandiwan_Mi_Ya_Sansari">बंदिवान मी ह्या संसारी</a> आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.  दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी  १९८८ आशा काळे(कमल)  लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं.  गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.  मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गर...