लेट नाईट

काल दुपारी प्राईमवर 'लेट नाईट' पाहिला. फारच धमाल आहे. आधुनिक पद्धतीने मांडलेला रॉ विनोद आहे. विनोदाबाबत 'हे विश्वची माझे घर' असणाऱ्यांनी जरूर पाहावा, संकुचित दृष्टिकोन असणाऱ्यांना मात्र झेपणार नाही. 'टू मच' वाटेल. खूप एंगेजिंग आहे, छोट्या छोट्या गोष्टींतूनही विनोदनिर्मिती केली आहे. एकुण भट्टी जमली आहे. एमा थॉम्सन प्रसिद्ध ब्रिटिश कॉमेडियन आहे पण तिला ब्रूटल किंवा क्रूर वाटावा असा विनोद फार मस्त जमतो. या आधीही क्रूएलात सावत्र वाटावी अशी सख्खी आई तिने जबरदस्त साकारली होती. येथे मला पुष्कळ ठिकाणी क्रुएलाची आणि 'डेव्हिल वेअर्स प्राडा'ची आठवण आली. पूर्ण आयुष्य करिअरला वाहून घेतलेल्या मुलंबाळं नको असलेल्या छप्पन वर्षांच्या स्टँड अप कॉमेडियनची तिच्याच शो वरून हकालपट्टी होणार असते. त्या शो शिवाय तिला दुसरी फारशी ओळख नसते, मित्रमैत्रिणी नसतात. स्वभाव प्रचंड उद्धट व तुसडा असतो. सगळे पुरुष हाताखाली ठेवून 'उठता लाथ बसता बुक्की' या धाकात ठेवलेले असते आणि फक्त वुमन ऑफ कलर -डायव्हर्सिटी हायर म्हणून मिंडीला लेखक म्हणून घेते. त्या आधी तिच्याशिवाय एकही स्त्री ते...