पोस्ट्स

ॲनिमल

इमेज
  मला अजिबात आवडला नाही ॲनिमल. हिंसेच्या बाबतीत मी असहिष्णू नाही, मला 'मिर्झापूर' आवडली होती. त्यात हिंसेला त्या पात्राच्या क्रौर्याचा/ विकृतीचा किंवा प्रतिशोधाचा व्यवस्थित आधार होता. ॲनिमलमध्ये मात्र 'इतका रक्तपात दाखवू की तुम्ही भंजाळून आवडला म्हणाल' असा अप्रोच आहे. इथल्या विकृतीला कसलाच आधार नाही किंवा कसली सुसूत्रताही नाही. कसल्याच भावभावनांचे स्पष्टीकरण दिले नाही. रणबीरच्याच नाही तर अनिल कपूरच्याही नाही. काहीही कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही. कुणीकडूनही चिळकांडी उडवायला निमित्त. बंदूक असतानाही कुऱ्हाडीनं मारताना/ गळा आवळून मारताना दाखवण्याचा काय हेतू होता. एकही विनोद दर्जेदार नाही, थोडंही हसू येत नाही. चीप तर आहेतच पण 'आऊट ऑफ प्लेस'ही आहेत. घरातील शेकडो लोकांसमोर डॉक्टर 'सेक्स लाईफ' विषयी कंसल्ट करते आणि हा मूर्खासारखा तिची उलटतपासणी करतो. सत्यनारायणाची पूजा आहे की काय. गाणीही बंडल आहेत, चड्डीचे 'हस्तांतरण' करून 'मराठी पंजाबी भाई भाई' दाखवणं किती बावळटपणाचं आहे. मला विकृतीपेक्षाही या सर्व मूर्खपणाची जास्त शिसारी आली. जरा इंटेलिजन्ट विकृती

९६

इमेज
 96 बघितला. प्राईमवर सबटायटल्स सहित. (कदाचित स्पॉयलर्स असतील ) https://www.maayboli.com/node/84513?page=5 दोघांनी अतिशय सुंदर काम केले आहे. शाळकरी प्रेमपटांचा कंटाळा आला आहे पण ह्यांनी तो भाग फार ताणला नाही. एका रात्री पुरती सिंगापूरहून ती रियुनियनसाठी आलेली असते व बरेचसे मळभ दूर होऊन क्लोजर मिळवून परत जाते. सेथुपती जबरदस्त काम करतो, तृषाही तोडीसतोड. त्यानं हे शाळेतलं प्रेम अगदी हृदयातील अत्तराच्या कुपीसारखं जपून ठेवलं आहे. स्त्री म्हणून त्यागाचं व जे मिळेल त्यात सुख मानण्याचं ट्रेनिंग असल्याने ती थोडीफार 'मुव्ह ऑन' झाली आहे पण हा नाही. त्याला तिच्याबद्दल इतकं प्रेम आणि आदर  वाटतो की तो तिच्या आसपास प्रचंड ऑकवर्ड- निःशब्द होतो, तिला ही फजिती बघायची कधी मजा- कधी राग येतो. एक संपूर्ण रात्र एकांत मिळून अजूनही इतकं आकर्षण असून हे गप्पाच मारत बसतात. तिचा ओझरता स्पर्श झाला तरी हा शॉक लागल्यासारखं करतो. प्रेक्षकांना 'अरे, असू दे लग्न झाले असले तरी, एवढे आकर्षण आहे तर करा नं किस' असे होते, पण नाही. सेथुपती म्हणजे मर्यादापुरुषोत्तम..! तृषा हवं तेव्हा सात्विक- हवं तेव्हा मादक(PS)

ही अनोखी गाठ

इमेज
 ही अनोखी गाठ' बघितला. #स्पॉयलर्स असतील.‌ श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, सुहास जोशी, शरद पोंक्षे आणि ऋषी सक्सेना ( 'काहे दिया परदेस' मधला शिव) सगळ्यांचा अभिनय कृत्रिम आहे. गाणी बरी वाटतात पण नंतर आठवत नाहीत. शरद पोंक्षे 'चिडक्या बिब्ब्याच्या रोलमधे अडकला आहे. 'बाई पण' मधेही भाजी- चटणी वरुन किरकिर करत होता. इथंही बायकोला कानाखाली देतो, मुलींना ताब्यात ठेवतो. मोठ्या मुलीचं बळच लग्न ठरवतो जी एम ए करत असते आणि तळपदेचं पात्र आठ वर्षांनी मोठं दाखवलं आहे. मोठी मुलगी अचानक मरते मग गौरी इंगवले - आम्ला तिचं नाव, जी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असते. तिला अचानक बोहल्यावर उभे करतात. ऋषी कॅमेरामन असतो हिला नाचताना बघून ती त्याला आवडायला लागते. ही दोनतीन भेटीत स्वतःला काडीमात्र प्रेम नसतानाही बळजबरीच्या लग्नाआधी पळून जायला बघते तर ऋषी तिला स्टँडवर घ्यायला येत नाही. ह्यापेक्षा थक्क करणारं म्हणजे तरीही ती लग्नानंतर सुद्धा त्याच्यामागे जाते. सातत्याने येणारा एकही रेड फ्लॅग तिला दिसत नाही. तिचंही कुणावरच प्रेम नसतं, कुणाचंच कुणावर प्रेम नसतं. तरीही टॉक्सिक पेट्रियार्कीला शर्करावग

खरडण्यामागचे खरडणे कदाचित...

इमेज
  मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा -२०२४ मराठी: लेखन घडते कसे - उपक्रम ---------------- शाळेत असल्यापासून लिहायचे. जवळजवळ प्रत्येक निबंध स्पर्धेत पहिला नंबर यायचा. चित्रकला, संस्कृत, हिंदी, वक्तृत्व, गणित, रामायण, अभिवाचन, विज्ञान, रांगोळी, कलाकृती बनवणं सगळ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, बहुतेकवेळा नंबरही यायचा आणि सगळ्यातच रूची होती. पण लेखनात जास्त मुक्त वाटायचं. एक्स्ट्रोव्हर्ट मुलगी होते मी शाळा कॉलेजमध्ये. एकदा आंतरशालेय निबंध स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पपांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यामुळे मी एक्स्प्रेसिव्ह आहे, नाहीतर नांदेडसारख्या लहान शहरात नव्वदीच्या दशकात मुलींची तोंडं दाबण्याला 'वळण लावणं' समजायचे. पर्यायाने मला आजूबाजूला उद्धट समजण्यात यायचं.‌ नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. माझ्या जन्माआधीच ते गेले पण माझे आजोबा आणि वडील फार वेगळे आहेत. आमच्या घरी फार चांगल्या माणसांचं येणंजाणं होतं आणि श्रीमंत नाही पण तिथल्या इतरांपेक्षा चांगल्या- उच्च वैचारिक वातावरणात मला रहायला मिळाले आहे. वाड्यातल्या भिंतीतली कपाटं पुस्तकांन

12th Fail (Hindi movie)

इमेज
  12th Fail सुरेख जमलाय.  खूप आवडला. विक्रांत मेस्सी ह्रितिक एवढा ग्लॅमरस नाही म्हणून त्याला टॅन करून जे तांबडं केलं आहे ते फार खटकत नाही. ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे, त्याला सर्वसाधारण दाखवणं अशक्य आहे. सुपर ३० आवडला होता. बघताना तुलना केली गेली नाही. त्याचं शरीरही किरकोळ आहे, त्यामुळे तो गिरणीत काम करताना ज्या हालचाली करतो त्या एकदम आदर्श वाटल्या आहेत. पांढरपेशे एवढे चपळ नसतात, हालचालीत चिवटपणा नसतो. आपल्याला त्यांच्या सारखं तासनतास उकिडवं बसता येत नाही, आपण मागच्या मागे पडतो. ते फार काटक असतात... ते त्याने फारच छान दाखवले आहे. पटकन भोरगं टाकून कुठंही अंग टाकतात. त्याने बाबा आल्यावर कसं झटकले तसं, मैत्रिणीलाही किती प्रेमाने स्टूल स्वच्छ करून दिला. मला त्या दोघांचे प्रेम फारच आवडले, त्या वयात जसं उच्छृंखल प्रेम असतं, त्याचा लवलेशही नव्हता. अतिशय पोक्त आणि समजदार नातं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्याने जी जिद्द, चिकाटी आणि तत्त्वनिष्ठता दाखवली त्यानं भरूनच आलं. त्याच्या मित्रांनी दिलेला सपोर्टही कौतुकास्पद, 'आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही' म्हणतो. हे कळणं किती प्रगल्भ आह

रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या Stopping by woods on a snowy evening या कवितेचा भावानुवाद

इमेज
 <em>Whose woods these are I think I know. His house is in the village, though; He will not see me stopping here To watch his woods fill up with snow. <em>My little horse must think it queer To stop without a farmhouse near Between the woods and frozen lake The darkest evening of the year.</em> <em>He gives his harness bells a shake To ask if there is some mistake. The only other sound’s the sweep Of easy wind and downy flake.</em> <em>The woods are lovely, dark and deep, But I have promises to keep, And miles to go before I sleep, And miles to go before I sleep.</em></em> ----------- रॉबर्ट फ्रॉस्टची ही कविता सर्वांच्या परिचयाची आहे. त्यांना ही कविता सुचली त्या काळात आर्थिक चणचणीमुळे आपल्या मुलांसाठी नाताळाला काही भेटवस्तू घेता आल्या नाही याचं त्यांना अपार दुःख झालं होतं. एक आपेशी पिता म्हणून टोचणी लागलेली असल्याने त्यांना आत्महत्येचे विचार यायला लागले पण त्यांनी हताश मनाला पुन्हा एकदा समजावून योग्य मार्गावर नेले.  एक 'पृथ्वी' ना

Can you hear the music!

इमेज
  वैधानिक इशारा* जड-आध्यात्मिक लेख आहे, परत फिरा.   डेकार्टच्या मते आपण विचार करतो म्हणून आपण 'असतो', I think therefore I am ! पाश्चिमात्य तत्त्वज्ञान कुठेतरी विचारांतच अडकून पडले आणि पौर्वात्य त्यामानाने कितीतरी पुढे 'निर्विचारी' अवस्थेत गेले. अद्वैतवाद हा त्याहीपुढे जाऊन आत्म्याचे खरे रूप दाखवतो. त्यामुळे ज्यांना खऱ्याखुऱ्या अध्यात्माची ओळख हवी आहे, त्यांना जगभर फिरून पुन्हा घरी परतावेच लागते. पण फिरावंही लागतं , कारण इतर संस्कृतीतील अध्यात्मिक गूढ हे आपल्या आयुष्यातही टप्प्यांसारखे येतच असते. एका भटक्यानी एकदा बुद्धाला थेट विचारलं , 'परमात्मा' अशी काही गोष्ट खरोखरच अस्तित्वात असते का ? बुद्धाने उत्तरादाखल मौन धारण केले. कारण कुठलंही उत्तर दिलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्रज्ञेच्या प्रांतात येणाऱ्या गोष्टी ह्या त्या अनुभूती दरम्यानच अस्तित्वात असतात. जेव्हा आपण त्याला काही तरी नाव देत असतो ती अनुभूती नष्ट होत असते. जरा-व्याधी-मृत्यू यांच्यापासून अलिप्त असणाऱ्या तेजस्वी परमतत्त्वाला बौद्धप्रणालीत 'तथागत-गर्भ' असेही म्हणतात. एखादी गोष्ट गूढ असली की