पोस्ट्स

बंदिवान मी ह्या संसारी

इमेज
बंदिवान मी ह्या संसारी <a href="https://en.m.wikipedia.org/wiki/Bandiwan_Mi_Ya_Sansari">बंदिवान मी ह्या संसारी</a> आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.  दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी  १९८८ आशा काळे(कमल)  लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं.  गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.  मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची

बार्बी - इंग्रजी चित्रपट

इमेज
  बार्बी खूप आवडला. आपल्या प्रि-टीन आणि टीन मुलींसोबत सोबत आवर्जून बघावा असा सिनेमा आहे. गर्ली सिनेमा आहे असं वाटून मुलगा आला नाही घरीच 'जोकर' बघत बसला, मग मला पश्चात्ताप झाला की त्यालाही न्यायला हवे होते. कारण छुप्या पुरुषप्रधान संस्कृतीचा अवेअरनेस सगळ्यांनाच यायला हवा. काही काही विनोद वरून वरवरचे वाटतात पण त्याचा अर्थ खूप प्रोफाऊन्ड आहे. मार्गॉट रॉबी व रायन गॉसलिंग* दोघांनीही खूप छान काम केले आहे. दोघेही अतिशय सुंदर दिसतात, कधीकधी खोटे वाटतात पण त्यांचं खोटं वाटणं सुद्धा खरं वाटणं आहे. भावलाभावली आहेत नं   . America Ferrera व तिच्या मुलीचं नातं खूप नॉर्मल आणि रिलेटेबल आहे, फार छान काम केले आहे त्यांनी. तिचे व बार्बीची जनक* रूथ हिचे त्यातले प्रोलॉग खूप चपखल वाटले. डोजोमोजोकासाहाऊस वगैरे पंचेसही सही जमलेत. शेवटची पंधरा मिनिटे कथानकावरची पकड सुटली आहे. शिवाय मला केनांचं गाणं कंटाळवाणं वाटलं. शॅन्गचीचा हिरो यात दुसरा केन आहे. तो नाचतो व दिसतो छान. अनेक केन व अनेक बार्बी आहेत. ही गोष्ट stereotypical Barbie ची आहे. आमच्याकडे यातली बरीचशी खेळणी होती अजूनही आहेत, आम्ही त्याचीही आठवण

मी का वाचते ??

इमेज
आपण जे काही वाचतो, अगदी काहीही.... ते आपण स्वतःतल्या 'न जगलेल्या' , 'न अनुभवलेल्या' आयुष्यासाठी वाचत असतो. वैचारिक लेखन वाचण्यामागे तर लेखक सांगतोय त्या मनाच्या प्रतलात जाण्याचीच धडपड असते. जिथे एरव्ही आपल्याला involuntarily जाता येत नाही, कुणीतरी न्यायला लागतं. त्यामुळे हा प्रभाव फार काळ टिकत नाही. मगं आपण अजून वाचतो...अजून वाचतो....  हे विष  साधेसुधे नाही 'हलाहल' आहे. ज्या वेळी स्वतःला आपापले तिथे जाता येईल तेव्हा हे गूढच संपून जाईल. हॉलीवुडचे नट कसे म्हणतात, I do my own stunts, तसं I create my own हलाहल. दुसऱ्याच्या अनुभवाची खोली वाचणे व स्वतः ते अवकाश अनुभवणे असा फरक आहे. मगं आपले highs हे अजून higher आणि lows हे अजून lower मागतात आणि कौटुंबिक तेलकट चण्याफुटाण्यात मन रमत नाही/ किक बसत नाही. हे माझं 'मी (वैचारिक) का वाचते? ', यावर शोधलेलं उत्तर आहे. ते चूक/बरोबर असं काहीही नाही, फक्त निरिक्षण आहे.      मी का वाचते/वाचायचे सांगते. तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या मला एकसंध होण्याची धडपड होती. त्यामुळे कुठे तरी आपले दुवे शोधत वाचायचे. प्रत्येक पुस्तकात आपल

ऑपनहायमर

इमेज
  ऑपनहायमर.... ऑपनहायमर बघून आले, सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. व्यक्तिशः भूतकाळ-वर्तमानकाळ अशा कथेतल्या उड्या मला त्रासदायक वाटतात. तरीही समजला . आईनस्टाईनचे पात्र मुद्दाम डिटॅच वाटले.त्याच्या सापेक्षता सिद्धांताच्या पुढची पायरी म्हणावे असं हे संशोधन होते. त्यामुळे पुढं काय होऊ शकते याची त्याला जाणीव असल्याने तो त्रयस्थ दाखवला असावा. एफबीआईने ऑपनहायमरला देशद्रोही ठरवतानाचा कोर्टरूम ड्रामा भलता लांबला आहे. मला हिरोशिमा आणि नागासाकी मधला हल्ला दाखवतील असं वाटलं होतं पण न्यू मेक्सिको मधली चाचणी तपशीलवार दाखवली आहे. नंतर फक्त डॉ ऑपनहायमर यांच्या हावभावावरून घटनेची तीव्रता पोचवली आहे. तो असह्य ताण किलियन मर्फीने फार चित्रदर्शी दाखवला आहे. सुरवातीला दिसणारी निरनिराळे दृष्टांत/ व्हिजन्स याने तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे लक्षात येते. मॅट डेमन मला ओबडधोबड वाटतो पण इथे सूट झालाय. दोन्ही नग्न दृश्यं थोडी अनावश्यक वाटली व तेव्हाच गीतेतले संहारावरचे श्लोक म्हणायचे प्रयोजन कळले नाही. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचं कामही अप्रतिम झाले आहे. तो मला आवाजावरून ओळखायला आला, इतकं बेमालूम जमलं आहे. स्त्रियांना विश

Indiana Jones and the dial of destiny

इमेज
Indiana Jones and the dial of destiny चांगला आहे. लोकांना अतिशय वगैरे आवडतोय यात नॉस्टॅल्जियाचा भागच जास्ती असावा. स्वतंत्र कलाकृती म्हणूनही बरा आहेच, तरी काही ठिकाणी क्रिंज वाटत रहातो. हॅरिसन फोर्ड 'अवघे पाऊणशे' वयमान असूनही फार चांगला दिसतो. बांधा अजूनही उत्तम. पहिल्या अर्ध्या तासात नाझींना इतिहास बदलण्यासाठी आर्किमिडीजचे ते डायल किंवा टाईम मशीन हवे असते, त्यात AI ने चेहरा तरूण केलेला इन्डी एकदम ग्लोईन्ग कधी खरा कधी खोटा वाटत होता. पण स्पीलबर्गने जे काही होतं ते सफाईदार दाखवलं आहे. कथेचा काळही साठच्या दशकातील आहे. बरेच निरपराध लोक मरून हे पाचव्या मिनिटाला चिल करतात, खासकरून त्याची यातली जी गॉड डॉटर आहे ती. जरा जास्तच कूल आहे ती. ॲन्टोनिओ बॅन्डॅरस दिसला छोट्या रोलपुरता. क्रश होताच एकेकाळी, आता मला ओळखायला आला नाही. शेवटी गुहा, पोर्टल, नेहमीचे जाळं, पाण्यात पडून प्रवाहासोबत जाऊन योग्य ठिकाणी धडकणं वगैरे करत काळप्रवास करून परत येतात. सुरवातीला अंडरग्राऊंड सबवे ट्रॅक्सवरून यावयात घोडा घेऊन 'टुगडुक-टुगडुक' केलेलं आहे. नुसतं टुगडुकच नाही तर प्लॅटफॉर्म वरून ट्रॅक वर, या ट्रॅ

सिनेमा आणि मी: भाग २

इमेज
  'तू झूटी मैं मक्कार' आवडला नाही. हिंदी फिल्म इंडस्ट्री वरून कोणी तरी कोंबडं उतरवून टाकायची वेळ आली आहे. पूर्ण वेळ रणबीरचे क्लोजअप आहेत. देखणाच दिसतो तो पण अति केलंय. दाढीतल्या दोन केसांमधले अंतरही मोजू शकाल. अधेमधे श्रद्धा कपूरचे क्लोजअप आहेत. फार निस्तेज दिसते, डोळ्यांवरून तर आजारी वाटते. ही म्हणजे डोळ्यासमोर असताना फार आनंद/दुःख होत नाही पण पाठ फिरवली की विसरून जाते. कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार वाटतो.   शेवटची एअरपोर्ट 'धमाल' अजिबात जमली नाही. टायमिंग गंडलंय. सिनेमात प्रचंड क्रिंज संवाद आहेत.' द द ठुमका' गाण्याची कोरिओग्राफी अतिशय वाईट आहे. डोहाळजेवणाला बोलवलेले दहा हजार लोक गच्चीवर व अंगणात नाचतात. सर्वांचा आविर्भाव आपण फार काही तरी मजेदार करतोय असा आहे पण प्रेक्षकांपर्यंत काही पोचत नाही. हाकानाका. रणबीर मला रॉकस्टार , अजब प्रेम की गजब कहाणी, बर्फी, ऐ दिल है मधे फार आवडला होता. आवडताच आहे तो, पण आजकाल स्क्रीनवर एनर्जी जाणवत नाही. बोनी कपूर का आहे यात, डिंपल अशात किती काम करते. ब्रह्मास्त्र, पठाण, आणि हे. Weak script, average present

कोकोनट ट्रेल्स -१ 🥥🌴🌴

इमेज
  14 November 2022 https://youtube.com/@Coconut_Trails कोकोनटचे इन्स्टापेज