पोस्ट्स

खरडण्यामागचे खरडणे कदाचित...

इमेज
  मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा -२०२४ मराठी: लेखन घडते कसे - उपक्रम ---------------- शाळेत असल्यापासून लिहायचे. जवळजवळ प्रत्येक निबंध स्पर्धेत पहिला नंबर यायचा. चित्रकला, संस्कृत, हिंदी, वक्तृत्व, गणित, रामायण, अभिवाचन, विज्ञान, रांगोळी, कलाकृती बनवणं सगळ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, बहुतेकवेळा नंबरही यायचा आणि सगळ्यातच रूची होती. पण लेखनात जास्त मुक्त वाटायचं. एक्स्ट्रोव्हर्ट मुलगी होते मी शाळा कॉलेजमध्ये. एकदा आंतरशालेय निबंध स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पपांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यामुळे मी एक्स्प्रेसिव्ह आहे, नाहीतर नांदेडसारख्या लहान शहरात नव्वदीच्या दशकात मुलींची तोंडं दाबण्याला 'वळण लावणं' समजायचे. पर्यायाने मला आजूबाजूला उद्धट समजण्यात यायचं.‌ नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. माझ्या जन्माआधीच ते गेले पण माझे आजोबा आणि वडील फार वेगळे आहेत. आमच्या घरी फार चांगल्या माणसांचं येणंजाणं होतं आणि श्रीमंत नाही पण तिथल्या इतरांपेक्षा चांगल्या- उच्च वैचारिक वातावरणात मला रहायला मिळाले आहे. वाड्यातल्या भिंतीतली कपाटं पुस्तकांन...

12th Fail (Hindi movie)

इमेज
  12th Fail सुरेख जमलाय.  खूप आवडला. विक्रांत मेस्सी ह्रितिक एवढा ग्लॅमरस नाही म्हणून त्याला टॅन करून जे तांबडं केलं आहे ते फार खटकत नाही. ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे, त्याला सर्वसाधारण दाखवणं अशक्य आहे. सुपर ३० आवडला होता. बघताना तुलना केली गेली नाही. त्याचं शरीरही किरकोळ आहे, त्यामुळे तो गिरणीत काम करताना ज्या हालचाली करतो त्या एकदम आदर्श वाटल्या आहेत. पांढरपेशे एवढे चपळ नसतात, हालचालीत चिवटपणा नसतो. आपल्याला त्यांच्या सारखं तासनतास उकिडवं बसता येत नाही, आपण मागच्या मागे पडतो. ते फार काटक असतात... ते त्याने फारच छान दाखवले आहे. पटकन भोरगं टाकून कुठंही अंग टाकतात. त्याने बाबा आल्यावर कसं झटकले तसं, मैत्रिणीलाही किती प्रेमाने स्टूल स्वच्छ करून दिला. मला त्या दोघांचे प्रेम फारच आवडले, त्या वयात जसं उच्छृंखल प्रेम असतं, त्याचा लवलेशही नव्हता. अतिशय पोक्त आणि समजदार नातं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्याने जी जिद्द, चिकाटी आणि तत्त्वनिष्ठता दाखवली त्यानं भरूनच आलं. त्याच्या मित्रांनी दिलेला सपोर्टही कौतुकास्पद, 'आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही' म्हणतो. हे कळणं किती प्रगल्भ आ...

रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या Stopping by woods on a snowy evening या कवितेचा भावानुवाद

इमेज
 <em>Whose woods these are I think I know. His house is in the village, though; He will not see me stopping here To watch his woods fill up with snow. <em>My little horse must think it queer To stop without a farmhouse near Between the woods and frozen lake The darkest evening of the year.</em> <em>He gives his harness bells a shake To ask if there is some mistake. The only other sound’s the sweep Of easy wind and downy flake.</em> <em>The woods are lovely, dark and deep, But I have promises to keep, And miles to go before I sleep, And miles to go before I sleep.</em></em> ----------- रॉबर्ट फ्रॉस्टची ही कविता सर्वांच्या परिचयाची आहे. त्यांना ही कविता सुचली त्या काळात आर्थिक चणचणीमुळे आपल्या मुलांसाठी नाताळाला काही भेटवस्तू घेता आल्या नाही याचं त्यांना अपार दुःख झालं होतं. एक आपेशी पिता म्हणून टोचणी लागलेली असल्याने त्यांना आत्महत्येचे विचार यायला लागले पण त्यांनी हताश मनाला पुन्हा एकदा समजावून योग्य मार्गावर नेले.  एक 'पृथ्वी' न...

Can you hear the music!

इमेज
  वैधानिक इशारा* जड-आध्यात्मिक लेख आहे, परत फिरा.   डेकार्टच्या मते आपण विचार करतो म्हणून आपण 'असतो', I think therefore I am ! पाश्चिमात्य तत्त्वज्ञान कुठेतरी विचारांतच अडकून पडले आणि पौर्वात्य त्यामानाने कितीतरी पुढे 'निर्विचारी' अवस्थेत गेले. अद्वैतवाद हा त्याहीपुढे जाऊन आत्म्याचे खरे रूप दाखवतो. त्यामुळे ज्यांना खऱ्याखुऱ्या अध्यात्माची ओळख हवी आहे, त्यांना जगभर फिरून पुन्हा घरी परतावेच लागते. पण फिरावंही लागतं , कारण इतर संस्कृतीतील अध्यात्मिक गूढ हे आपल्या आयुष्यातही टप्प्यांसारखे येतच असते. एका भटक्यानी एकदा बुद्धाला थेट विचारलं , 'परमात्मा' अशी काही गोष्ट खरोखरच अस्तित्वात असते का ? बुद्धाने उत्तरादाखल मौन धारण केले. कारण कुठलंही उत्तर दिलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्रज्ञेच्या प्रांतात येणाऱ्या गोष्टी ह्या त्या अनुभूती दरम्यानच अस्तित्वात असतात. जेव्हा आपण त्याला काही तरी नाव देत असतो ती अनुभूती नष्ट होत असते. जरा-व्याधी-मृत्यू यांच्यापासून अलिप्त असणाऱ्या तेजस्वी परमतत्त्वाला बौद्धप्रणालीत 'तथागत-गर्भ' असेही म्हणतात. एखादी गोष्ट गूढ असली की ...

आत्मपॅम्फ्लेट

इमेज
  मला तर खूपच आवडला आत्मपॅम्फ्लेट. ते नॅरेशन जरी काही ठिकाणी लांबले असले तरी प्रेक्षक म्हणून एकदा त्याचा वेग अचूकपणे पकडला की आपण बरोबर रोलर कोस्टर सारखं खाली-वर जातो. नुकताच बघितलेला हेन्री शुगरही असाच वाटला होता. नॅरेशन वेगवान असण्याने कथानक एकाग्रता कमी असलेल्या प्रेक्षकाला धरून ठेवते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून टीमचं कौतुक वाटलं आणि जिथे मार्केट फेअर नाही तिथे कलाकृती नवीन धाटणीत सादर करणे याला हिंमत लागत असावी. माझ्यामते 'सर्वधर्मसमभाव' ह्या कन्सेप्टला कल्पकतेचा डेड एन्ड आला आहे. 'अमर ‌अकबर ॲन्थनी' पासून- ते 'बॉम्बे'- ते मागच्या आठवड्यात आलेला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' पर्यंत सगळे जॉन्रा+कथाप्रकार करून झालेले आहेत, तरीही हा सिनेमा मला रिफ्रेशिंग वाटला. कारण सगळ्या जातींच्या कंडिशनिंगवर वास्तववादी भाष्य करूनही सिनेमा कुठेही कडवट वा टोकदार झालेला नाही, त्याने प्रेक्षक म्हणून तो सहज स्विकारता येतो व प्रवचनाचं ओझं होत नाही. घराण्याचा मूळ पुरुष 'स्त्री' असणं हेही आवडलंय, आईबाबा, शिक्षक आवडले. मित्र तर खूपच आवडले. भावांनोने तर शेवटी धमाल ...

जवान

इमेज
  जवान -नेटफ्लिक्स दोन तास पन्नास मिनिटे लांबीचा- एकतर अतिशय मोठा आहे. त्यात कथानक वीस मिनिटात संपेल इतकं आहे , बाकीचे वीस तास मारामारी आहे. एकदा मधेच मी पॉज केलं तर टिव्हीवरच्या कोपऱ्यात 'एक्स्टेंडेड कट' दिसलं, प्राण कंठाशी आले होते, त्यात 'अब क्या बच्चे की जान लोगे क्या' झालं. दोन शाहरुख खान आहेत. एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. हो, विक्रम आणि आझादमधे तेवढाच फरक आहे. मोठ्या शाखा-विक्रमचा ट्रॅक सुरू झाला की माझं लक्ष उडालं. सेथुपतीनी हाणहाणहाणल्याने मोठ्या शाखाला 'याददाश्त खो गयी' झाले व एक्सप्रेशन नदीत वाहून गेले. डोळे फिरवून काहीतरी मिनिमम दाखवतो. मोठा शाखा जेव्हा तरूण होता, तेव्हा तो जितेंद्रचे कपडे घालून फिरत होता. पण तेव्हा तो स्वतंत्र पात्र- विक्रम वाटलाच नाही. देहबोलीत कसलाही फरक नाही, फक्त कपडे-केस बदलले. बाबा व मुलगा शाखा म्हणजे जस्टिस चौधरीच जणू. :फिदी: तरूण शाखा -आझादलाच फॅन्सी ड्रेसमध्ये पाठवलंय असं वाटलं. दिपीका तर साडी नेहमीपेक्षा खाली नेसणारी निरूपा रॉयच. इतकं रडली आहे की ज्याचं नाव ते. स्त्रियांचा तुरुंग हा एक लेडिज हॉस्टेलचा भाग वाटतो. अधुनमधून ...

The fall of the house of Usher

इमेज
  'Maybe' Spoiler alert**** नेटफ्लिक्सवर  The fall of the house of Usher  बघितली. एडगर ॲलन पो यांच्या संकलित गूढ कथांना एकत्र करून तयार केलेले कथानक व Mike Flanagan याचं दिग्दर्शन आहे. प्रचंड खिळवून ठेवणारी, अनप्रेडेक्टिबल, गूढ, कुठंकुठं अभद्र आणि भयंकर आहे. सर्वांची कामं जबरदस्त झाली आहेत. एका अनौरस बहिणभावांवर- Madeline Usher आणि Roderick Usher झालेला अन्याय, जिजसवर अंधविश्वास ठेवून औषधं न घेता तिळातिळाने झिजून मरणारी आई, माणुसकी नसलेले वडील, समाजात नसलेले स्थान -अशी पार्श्वभूमी असलेले ते दोघे अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. त्यात बहिणीचे पात्र अतिशय धूर्त , मतलबी व बुद्धिमान आहे. वैचारिक स्पष्टता असलेले नकारात्मक स्त्री पात्र खूप दिवसांनी बघायला मिळाले. तिनं अमेरिकन आयुष्यावर व त्यातील औषधी कंपन्यांच्या गुंत्यावर बोलून दाखवलेलं भाष्य तर फारच चपखल वाटलं. ३१ डिसेंबरला रात्री एका समांतर विश्वात असलेल्या पबमधे जातात, तिथल्या मृत्यूदेवतेला(Metaphysical -gothic entity) स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काही वचनं देऊन बसतात. नंतर बाहेर येऊन हे गूढ ते विसरून जातात. त्यानंतर जवळजवळ पन्नास ...