पोस्ट्स

धुरंधर - परिक्षण

इमेज
आज थिअटरमधे पाहून आलो. मला खूप आवडला. हिंसाचार, रक्तपाताचे काही वाटत नाही गॉट पाहिल्यापासून. जाट मधे तर 'आपने मेरी इडली गिरायी' म्हणत उगाचच केला आहे तसा येथे वाटला नाही. कथेमुळेच ते येत जातो, चित्रपटाचा प्रकारच ॲक्शनपट/ मारामारीचा आहे. मला चित्रपट खूप स्ट्रेट फॉरवर्ड, किंवा लिनिअर वाटला. खूपच क्लीन मुव्हमेंट असलेली ॲक्शन आहे. अजिबात "क्लम्जी" नाही, रक्तपात असूनही एकदम स्पष्ट आणि स्वच्छ हालचाली आहेत. वेगवान आहे पण एंगेजिंग आहे. मला सर्वात जास्त रणवीरचेच काम आवडले. अक्षय खन्नाचे चांगले आहेच पण त्याची हाईप जास्त आहे. सोशल मीडिया वर सगळ्या रील्स त्याच्याच आहेत. घाऱ्या डोळ्यांचा रगेड, मधूनच हरवल्यासारखा , कव्हर उघडे पडू नये म्हणून सहन करणारा, योग्य वेळेची वाट पाहणारा, पटत नसतानाही सहभागी होणारा, प्रसंगी आपल्याच देशातील घातपात बघून अश्रू पुसून अतिरेक्यांसोबत जयघोष करणारा - असे अनेक पदर असलेली भूमिका आहे. त्यामानाने इतरांच्या वरवरच्या आहेत. अर्जुन रामपाल त्याला जे येते ते करतो, क्रूर भूमिका आहे. पण फार आव्हानात्मक नाही. त्यामानाने राकेश बेदीची लेयर्ड आहे, कारण तो कुणाचाच नाह...

चित्रपटांच्या संदर्भ लिंक

इमेज
  धडक २ https://www.maayboli.com/node/87006?page=26

मी वाचलेले पुस्तक - संदर्भ लिंक

इमेज
  मी वा पु वरील - existential crisis वरील पोस्टी आणि चर्चा ( ऑक्टोबर २०२५) https://www.maayboli.com/node/81478?page=53

इरादा

इमेज
  काल इरादा (Irada) नावाचा सुंदर चित्रपट पाहिला. यूट्यूब वर Iraada नावाचा शत्रुघ्न सिन्हाचा एक सिनेमा आहे , तो हा नाही. यात नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी, दिव्या दत्ता आणि शरद केळकर, सागरिका घाटगे आहेत. सर्वांची कामं फारच भारी झालेली आहेत. पर्फॉर्मन्ससाठी पहावेत असे सिनेमे हल्ली निघत नाहीत, हाही २०१७ चा आहे. खऱ्या घटनेवर बेतलेली कथा आहे. भटिंडा येथील थर्मल- पावर प्लॅन्ट मुळे तेथील कनाल, नदी यात सोडल्याजाणाऱ्या कार्सिनोजेनिक केमिकल्स मुळे प्रत्येक घरात कॅन्सरचे रुग्ण सापडायचे. यावर काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये छापून आले होते. युरेनियमने होणारी विषबाधा, रिव्हर्स बोअरिंग, फर्टिलायझर मधून होणारी विषबाधा - या सगळ्यामुळे होणारे "इको - टेरेरिझम" यावर कथानक बेतलेय. थ्रिलर सिनेमा आहे. नसिरुद्दीन शाह एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे, मुलीला सुद्धा एअरफोर्स मधे पायलट करायचं स्वप्न आहे. त्यासाठी तिला रोज कॅनालमधे पोहण्याच्या सरावासाठी घेऊन जातो जेथे हे केमिकल्स सोडलेले असतात. ते पाणी नाकातोंडात जाऊन ती तडकाफडकी कॅन्सरने मरून जाते. तेथूनच सगळा प्रतिशोध सुरू होतो. शरद केळकर या थर्मल प्लान्टचा मालक...

आप जैसा कोई

इमेज
  आप जैसा कोई (नेटफ्लिक्सवर) माधवन, फातिमा सना शेख, नमित दास, आयेशा रजा, मनिष चौधरी हा नावावरून क्रिंज आणि ट्रेलरवरून फार काही खास किंवा नाविन्यपूर्ण नसलेला वाटला होता. सहज 'वर्क आऊट' करताना लावला आणि याने खिळवून ठेवले. संपूर्ण पाहूनच उठले. 'आप जैसा कोई' ऐवजी 'आज जाने की जिद ना करो' नाव ह्यातल्या रोमॅन्ससाठी चपखल ठरले असते.‌ इतका vintage आणि हुरहूर लावणारा आहे. माधवन(श्रीरेणू त्रिपाठी) एक ४२ वर्षे वय असलेला संस्कृतचा शिक्षक आहे. लग्न जमत नाहीये, कुणालाच तो इंटरेस्टिंग वाटत नाही. फातिमा (मधू बोस) एक ३२ वर्षांची फ्रेंचची शिक्षिका आहे. नमित दास मित्राच्या भूमिकेत आहे, फार भारी काम करतो आणि अंडररेटेड वाटतो. आयेशा रजा एकदम गृहकृत्यदक्ष, आई एवढा जीव लावणारी मायाळू वहिनी व मनिष चौधरी इतरांना ताब्यात घेणारा एकदम पुरूषसत्ताक विचारांचा मोठा भाऊ आहे. मधू बोसचे कुटुंब एकदम प्रेमळ आधुनिक विचारांचे कलकत्त्यातील टिपिकल बंगाली कुटुंब आहे. माधवनचे कुटुंब आगरतळा व जमशेदपूरचे दाखवले आहे. मुंबई, दिल्ली, पंजाब, युपीही न दाखविल्याबद्दल टिमचे कौतुक. श्री प्रचंड एकलकोंडा, लाजाळू व इंट्...

द ओव्हरकोट - निकोलाय गोगोल

इमेज
  एक अतिशय बिनमहत्त्वाचा माणूस असतो.‌  Akaky Akakievich Bashmachkin  त्याचं नाव. हे नाव रशियन भाषेत सुद्धा महत्त्वाचे नाही. 'अकाकी' जणू एकाकीच. अकाकी जेव्हा त्याच्या आईच्या पोटी आला, सचोटीने वागणारी, पापभिरू बाईच ती. हा जेव्हा तिच्या पोटी आला तीन वेगवेगळ्या गॉडपेरेंट्सनी सुद्धा तिला धड नावं सुचविली नाहीत. मग तिने देवाचा धावा केला म्हणजे चर्चमधे विचारले तर तेथे तर त्याहीपेक्षा विचित्र नावं सुचविली गेली. जणू अकाकी देवासाठी सुद्धा बिनमहत्त्वाचा. शेवटी या नावांपेक्षा तिच्या बाळाला त्याच्या बाबाचे नाव देऊन मोकळी झाली. अकाकीचे नाव सुद्धा संपूर्णपणे त्याचे नाही. हा असा अकाकी आयुष्यभर गरीब व अदृष्यच राहिला. गोगोलना त्याला पर्सनॅलिटी न देता कथेचा नायक केले आहे. मुन्शी प्रेमचंदच्या कथांशी मिळतीजुळती दुःखद कथा आहे असे वाटतावाटता ती अंताकडे अद्भूत व अमानवीय होऊन जाते. अकाकी- अतिशय सामान्य काहीशा ओबडधोबड रूपाचा, बुटका- मध्यमवयीन माणूस आहे. सेंट पिटर्सबर्ग या रशियातील शहरात एका सरकारी विभागात कारकून आहे. ह्या विभागाचं नाव न गुप्त ठेवण्याची दहा कारणं सांगितलीत गोगोलने. ब्यूरोक्रॅटिक #ल...

मराठी भाषा गौरव दिन २०२५ - शब्द

इमेज
  माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हि च्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !    /\ https://www.maayboli.com/node/86385 माझे आजोबा मला म्हणायचे "वाणी प्रसन्न आहे तुझ्यावर, सुपारी खात जाऊ नकोस. शारदेला रुष्ट करू नकोस." वाणी म्हणजे नेमकं काय हे आताही कळालेलं आहे की नाही माहीत नाही. वाणी म्हणजे आपल्या मुखातून (किंवा लेखनातून) बाहेर येणाऱ्या शब्दांतील ऊर्जा असावी... कदाचित. आणि शब्द.... सगळीकडे विखुरलेले, आपल्या अवतीभवती भिरभिरणारे, कधी सुई तर कधी काट्यासारखे बोचणारे, कधी मऊसुत वाटणारे, कधी दिलासा देणारे, कधी आपले वाटले नाही तरी रूंजी घालणारे, बोलायलाच हवेत असेही नाही -लिहिले तरी पोचणारे. कधी परस्पर वाहणाऱ्या ढगासारखे पाऊस न पाडताच निघून जाणारे, कधी स्वतःचा अर्थ आपल्याला शोधायला भाग पाडणारे, मनातल्या काहुराला वाट करून देणारे..! शब्द बापडे केवळ वारा अर्थ वागतो मनांत सारा नीटनेटका शब्द पसारा अर्थाविण पंगू भाषा कुठलीही असो, आपली भाषा आपल्याला शब्द देते. ते शब्द आपल्याला विचारांची चित्रं काढणारी रंग देऊन जातात. ज्याचा शब्दसंग्रह जास्त त्या...

जाट

इमेज
  जाट साधारण अर्धा पाहिला. सतत मारामारी आहे, सतत. चित्रपट कुठेच नाही फक्त मारामारी. कथा कुठेच नाही फक्त मारामारी. शंभर माणसांच्या पनीरच्या भाजीत पनीरचा एक तुकडा टाकून बाकी ग्रेव्ही वाढत 'हे घ्या पनीर' चा आव आणला आहे. संपूर्ण चित्रपट साऊथचाच आहे. त्यामुळे विचित्र पेट्रियार्कीची परंपरा आहे, सारखं स्त्रियांना विवस्त्र करून त्यांचा अपमान करण्याचे सीन आहेत. पोलिस असलेल्या स्त्रियांना सुद्धा विवस्त्र केले आहे, चित्रपट तेथूनच सुरू होतो. साऊथच्या सिनेमात स्त्री प्रेक्षकांना ऑकवर्ड करणारे पण सन्मान देतोय असं भासवणारे सीन्स देण्याची पद्धत आहे. हिरोला महानायक करण्यासाठी त्यांनी त्याची परंपरा केली आहे. जी किळसवाणी वाटते. 'पुष्पा' हा एक महामूर्ख सिनेमा होता. त्यात पुष्पाने व्हिलनला मारताना 'औरतोकी इज्जत करते है' वर प्रवचन देऊन नंतर रश्मिकाला त्याच्याकडे बघून हसण्याचे पाच हजार दिले होते. हे इतकं दर्जाहीन आहे की ज्याचं नाव ते. पण त्यांच्या आदराच्या व्याख्या हुकलेल्या आहेत. पुन्हा जाट - हा ट्रेकिंगला या साऊथच्या गावात आलेला आहे म्हणे. आधी तो दालरोटीच विचारतो धाब्यावर. त्यातल्या...

काला पत्थर

इमेज
  काल 'काला पत्थर' शेवटची अठ्ठावीस मिनिटे सोडून पाहिला. त्यात संजीव कुमार, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, राखी, परविन बाबी, नीतू सिंग एवढी दणदणीत स्टार कास्ट आहे. शत्रुघ्नचे बरेचसे संवाद "बाळ - राकु" गटात येणारे वाटले. मंगलका खून कोई ऑरेन्ज कोला (?) नहीं है, जो विजय एक झटकेमें पी जाये. एकदम राकु रिअलायझेशन झाले पण राकु सारखे कोणी नाही. गुण, बुद्धी, रूप, प्रतिभा, सुडौल बांधा, काहीकाही नाही पण शून्य आत्मभान व त्यामुळे येणाऱ्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे साक्षात दैवी रूप म्हणजे राकु. त्यामुळे शत्रु फक्त भक्त वाटतो, देव नाही. अमिताभचे संवाद तर जीएंच्या व्यक्तिरेखांचे संवाद वाटावेत इतके विमनस्क व हताश आहेत. त्याचा पूर्वेतिहास - एका जहाजाचा कॅप्टन असतो ते जहाज दुर्दैवाने बुडताबुडता वर येऊन बसते, त्याने ह्याचे आपल्या जहाजाला सोडून दिलेला भ्याड कॅप्टन म्हणून कोर्ट मार्शल होते व तो जीए- धर्म स्विकारून एकदम शब्दशः 'भूमिगत' होऊन कोळशाच्या खाणीत मजूर होतो. हमारी कश्ती वहां डुबी जहाँ पानी कम थाच्या- उलट हमारी कश्ती वहां आपोआपच बाहर आई जहां पाणी का वावटळ था.  शशी कपू...

Transcendence

इमेज
  Transcendence (Prime) ( Trailer ) Johnny Depp, Rebecca Hall, Morgan Freeman, Cillian Murphy जॉनी डेप हा नॅनो टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला जगप्रसिद्ध वैज्ञानिक आहे. त्याची 'पार्टनर ईन सायन्स' आणि 'पार्टनर ईन लाईफ' रेबेका सुद्धा त्याची त्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात साथ देते. प्रत्यक्षात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मात्र ती फिलियांथ्रॉपिस्ट विचारांची आहे. तिच्या महत्त्वाकांक्षा मात्र जग अजून सुखी कसे होईल, पर्यावरणात समतोल कसा येईल, लोकांचं आयुष्य अजून सोयीचं कसं होईल- अशा असतात. त्याच्या महत्वाकांक्षा ह्या- तो अजून कसा आंतरजाल, टेक्नॉलॉजी व स्टेम सेल रिसर्च मधे पुढे कसा जाईल अशा आहेत. त्यांचा एक फिलॉसॉफीकल विचारांचा दुसरा प्रोग्रामर मित्रंही आहे. ह्या तिघांची एक कंपनी आहे, ज्यात मॉर्गन फ्रिमन गुंतलेला आहे आणि गोवर्नमेंट ऑफिशियल आहे. हा प्रकार हाताबाहेर जातो आहे म्हणून एक ॲन्टि -टेक्नॉलॉजी/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेरिरिस्ट ग्रूप याच्यावर गोळीबार करतो. सुरवातीला तेच खलनायक वाटतात पण नंतर त्यांचेही चूक नव्हते असे वाटते. त्यांच्या गोळीबारात जॉनी डेपला ...

Blood Diamond

इमेज
  ब्लड डायमंड - प्राईमवर पाहिला. Leonardo DiCaprio, Jennifer Connelly, Djimon Hounsou प्राईमवरून जात आहे व पाच ऑस्कर नामांकन मिळालेली दिसल्याने पाहिला. सिएरा लिओन सिव्हिल वॉरच्या काळात तेथील दहशतवाद्यांनी तिथल्या सामान्य जनतेला गुलामासारखे वागवून हिऱ्यांच्या खाणीतून हिरे - ओबडधोबड, न तासलेल्या स्वरूपातील काढून घेण्यासाठी भयंकर अन्याय व शोषण केले जाण्याची कथा आहे. कथा आणि अभिनय जबरदस्त आहे. भयंकर वेगवान पॉलिटिकल वॉर थ्रिलर आहे. त्या शोषित जनतेने मत देऊ नये व तिथली सत्ता बदलू नये, गुलामगिरी, अन्याय व हिऱ्यांचा गैरव्यवहार असाच चालू रहावा म्हणून एकेकाचे हात तोडून टाकलेले सीन आहेत. भयंकर अंगावर येणारा सिनेमा आहे. त्रासदायक बाब म्हणजे हे खरेच असले पाहिजे असे वाटून क्लेश होतात. सगळी सप्लाय चेन अशी बनवली आहे की ज्यांचे शोषण होते त्यांना वाचा उरली नाही, सगळे अव्याहतपणे सुरू रहावे म्हणून संपूर्ण जगातील लोक याकडे दुर्लक्ष करतात. जेनिफर कॉनली (मेरी बॉवेन्स) नावाची अमेरिकन जर्नलिस्ट आहे. लिओ एक स्वतःचे आईवडील नवव्या वर्षी बलात्कार व मुंडके उडवलेले बघितल्याने- यातच मोठा झालेला प्रसंगी निर्ढावलेल...

Passengers

इमेज
  सायन्स फिक्शन प्राईमवर पाहिला आहे. Passengers ( Trailer ) Jennifer Lawrence, Chris Pratt एका स्पेशशिपवर पाच हजार लोक पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर रहायला चालले आहेत. त्या सगळ्यांना क्रायॉनिक- हायबरनेशन झोपेत पॉड्स मधे नव्वद वर्षांसाठी ठेवले आहे. स्पेशशिप ॲस्ट्रॉईड बेल्ट मधून जाताना उल्का ( debris) आदळून त्यात तांत्रिक बिघाड होतो व एक पॉड आधीच उघडून क्रिस उठून बसतो. संपूर्ण स्पेशशिपवर तो एकटाच जागा असतो, पृथ्वीवर संदेश जाण्यासाठीही पन्नास वर्षे लागणार असतात. हरप्रकारे प्रयत्न करूनही तो पुन्हा हायबरनेट होऊ शकणार नसतो. अशा वर्षभराच्या एकटेपणात तो एका सहप्रवासी- जेनिफरची ( ऑरोरा) ची सगळी माहिती काढतो. ती एक लेखिका असते, तिचे लेखन वाचून तिच्या प्रेमात पडतो, तिच्या मनाच्या- ती जशी विचार करते ते वाचून -प्रेमात पडतो. आणि तिला पॉडमधून उठवण्याचे ठरवतो. ती सुंदर, मिश्किल, प्रसन्न व हुशार असते. तिला उठवल्यानंतर ते खरोखरच प्रेमात पडतात. रोमान्स खूप छान दाखवलाय. साय फाय सिनेमात रोमान्स वर भर नसतो. पण सुरवातीला एकटेपणा, सुटकेचे प्रयत्न यात खूप संथ वाटतो. जेनिफर उठली की कथा मस्त रोमॅन्टिक होते. श...

Limitless

इमेज
  पीकॉकवर ब्रॅडली कूपर, रॉबर्ट डी नेरो, ॲबी कॉर्निश यांचा ' लिमिटलेस ' पाहिला. सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे पण भरपूर मारामारी आहे. ब्रॅडली हा एक रायटर्स ब्लॉक आलेला, महत्त्वाकांक्षी नसलेला एडी मोरा नावाचा अपयशी- दिशाहीन पूर्वी एक औट घटकेचे लग्न होऊन घटस्फोट घेतलेला लेखक आहे. त्याची लिन्डी नावाची सध्याची गर्लफ्रेंड पण त्याला सोडून जातेय. या अशाच दिशाहीन काळात त्याला एक्स बायकोचा भाऊ मार्केट मधे आलेले आणि क्लिनिकल ट्रायल न झालेले नोआट्रॉपिक प्रकाराचे ड्रग देतो. नोआट्रॉपिक -कॉग्निटिव्ह क्षमता वाढवणारे. सगळीच इंद्रिये धारदार करून टाकणारे. एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, निरीक्षणशक्ती यासहित सगळेच आयक्यू चार आकडी होऊन जाणारे. सगळ्या भाषा यायला लागतात, कुठल्याही विषयात नैपुण्य मिळवायला काही क्षणांचे निरीक्षण पुरायला लागते. पुढे या NZT नामक गोळ्यांनी तो सुपरह्यूमन होऊन ट्रेड आणि स्टॉक मार्केटची अंदाज घेत झटपट कुठल्याकुठे जातो. पण या गोळ्यांचे विथड्रॉवल सिम्पट्म्स  dissociative fugue यायला लागतात म्हणजे आपण कुठे होतो आणि काय केले हे काही काळासाठी मेमरीतून अदृश्य होऊन जाते. अशा टाईम स्...

फस्सक्लास दाभाडे

इमेज
 ' फस्सक्लास दाभाडे'   आज पाहिला. आवडला. धन्यवाद.   *स्पॉयलर्स असतील. सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ व क्षिती जोग तिघे बहिण-भाऊ आहेत. राजन भिसे व निवेदिता जोशी आईबाबा आहेत. उषा नाडकर्णी आत्या आहे. राजसी भावे ( लाईक आणि सबस्क्राईब) ही अमेय वाघची नववधू आहे. फस्सक्लास दाभाडे नाव का आहे कुणाला माहीत पण साधारण दाभाडे कुटुंबातील दुरावलेल्या नात्यांवर, दुराव्याचे कारणही कुठेतरी एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारे कुटुंबातील सदस्य, एकमेकांकडून बऱ्याच अपेक्षा पर्यायाने अपेक्षाभंग यावर संपूर्ण पटकथा बेतलेली आहे. नंतर हळूहळू दुरावा कमी होत जाऊन नात्यांची खासकरून भाऊबहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करणारा प्रवास आहे. सर्वांचीच कामं उत्तम झाली आहेत, पण मला क्षिती जोगचे काम सर्वात जास्त आवडलं. ती माहेरी बरीच ढवळाढवळ करणारी, कडाडून भांडणारी पण मुळात प्रेमळ बहिण आहे. तिघाही भावंडांचे सिरियस ईश्यूज आहेत. आई अंधश्रद्ध व वडील मितभाषी दाखवलेत. त्यामुळे आईची सर्वांचे 'अहं' जपताजपता तारेवरची कसरत होत असते. सिद्धार्थचा घरगुती कारणांमुळे लग्न मोडून तुसडा देवदास झाला आहे. क्षितीच्या निपुत्रिक असण्यावर...

नादानियां

इमेज
  नादानियां पूर्ण बघितला. हो, बंडलच आहे पण खात्री झाली. जिमी शेरगील नाही सिनेमात, विकुंनी रॉन्ग नंबर दिला. जुगल हंसराज आणि दिया मिर्झा ( घ्या आता) इब्राहिमच्या आईबाबाच्या रोलमधे आहेत. सुनील शेट्टी आणि महिमा चौधरी खुशीच्या आईबाबाच्या. दियाला मॉं वतारात बघून मलाच क्लेश झाले. खुशी समोर तर अप्सराच वाटत होती. खुशीचा अभिनय इतका वाईट आहे की अनन्या पांडे सुद्धा मेरिल स्ट्रिप वाटावी. इब्राहिम संवाद नवीन वाचायला शिकलेला पहिलीतला मुलगा कसं अक्षरं फोडून वाचेल तसे म्हणतो. खु शी मु झे डि बे ट कं पि टि श न का टॉ प र ब न ना है... हे असे.  सुशे खूप श्रीमंत पण पुरुषसत्ताक विचारांचा बाबा आहे. 'मला वाटलं मुलगा होईल आणि मी त्याला आयव्ही लीग मधे घालून मोठा वकील करेन पण झाली ही गॉर्जिअस मुलगी आता ती पेस्ट्री शेफ किंवा ड्रेस डिझायनर होणार तेथेही' असं बोलत असतो. बायकोला मुलासाठी वारंवार आयव्हीएफ करायला लावतो, ज्या फेल झाल्याने लफडे करून त्या बाईला प्रेग्नंट करून लग्नही करणार असतो. कशासाठी तर 'सिंघानिया ॲन्ड सन्स' नावं रहावे. तेही ठीक आहे पण त्याला त्याची चूक उमगत नाही, तो नंतर दाखवलाच नाही. ही...

लेट नाईट

इमेज
  काल दुपारी प्राईमवर 'लेट नाईट' पाहिला. फारच धमाल आहे. आधुनिक पद्धतीने मांडलेला रॉ विनोद आहे. विनोदाबाबत 'हे विश्वची माझे घर' असणाऱ्यांनी जरूर पाहावा, संकुचित दृष्टिकोन असणाऱ्यांना मात्र झेपणार नाही. 'टू मच' वाटेल. खूप एंगेजिंग आहे, छोट्या छोट्या गोष्टींतूनही विनोदनिर्मिती केली आहे. एकुण भट्टी जमली आहे. एमा थॉम्सन प्रसिद्ध ब्रिटिश कॉमेडियन आहे पण तिला ब्रूटल किंवा क्रूर वाटावा असा विनोद फार मस्त जमतो. या आधीही क्रूएलात सावत्र वाटावी अशी सख्खी आई तिने जबरदस्त साकारली होती. येथे मला पुष्कळ ठिकाणी क्रुएलाची आणि 'डेव्हिल वेअर्स प्राडा'ची आठवण आली. पूर्ण आयुष्य करिअरला वाहून घेतलेल्या मुलंबाळं नको असलेल्या छप्पन वर्षांच्या स्टँड अप कॉमेडियनची तिच्याच शो वरून हकालपट्टी होणार असते. त्या शो शिवाय तिला दुसरी फारशी ओळख नसते, मित्रमैत्रिणी नसतात. स्वभाव प्रचंड उद्धट व तुसडा असतो. सगळे पुरुष हाताखाली ठेवून 'उठता लाथ बसता बुक्की' या धाकात ठेवलेले असते आणि फक्त वुमन ऑफ कलर -डायव्हर्सिटी हायर म्हणून मिंडीला लेखक म्हणून घेते. त्या आधी तिच्याशिवाय एकही स्त्री ते...